जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन क्षमतेने हे गाळप चालू आहे. त्यामुळे गाळप हंगाम वाढत चालला आहे.

सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात सिंचन प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस क्षेत्र देखील वाढले आहे. परिणामी जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यात मोठी वाढ झाली असून सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने खासगी कारखाने देखील वाढले आहेत. प्रत्येक कारखान्याने आपल्या गाळप क्षमतेत वाढ केली असल्यामुळे मागील सलग ३ हंगामात जिल्ह्यात १०० लाख क्विंटल पेक्षा जास्त साखर उत्पादन झाले आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण १७ कारखाने ऊस गाळप करत आहेत. यात ९ साखर कारखाने सहकारी आहेत. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४५ हजार २०० आहे. जिल्ह्यात ८ खासगी कारखाने असून त्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४५ हजार २५० आहे.

फेब्रुवारी अखेर ‘इतके’ लाख टन गाळप

यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. जवळपास १२० दिवसांचा हंगाम संपला. प्रतिदिन ९० हजार ४५० प्रमाणे गाळप झाले असते तर १०० लाख क्विंटलचा टप्पा पूर्ण झाला असता, मात्र, फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात ८२ लाख २४ हजार मे टन गाळप झाले असून ८५ लाख १२ हजार १७३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.