कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास माहिती प्राप्त झाल्यानंतर या पथकाने कराड शहरातील कृष्णा नाका येथे गांजाची विक्री करण्यास आलेल्या एका सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 60 हजार रूपये किमतीचा 1 किलो गांजा व 1 दुचाकी जप्त केली आहे.
गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात कार्वेनाका या ठिकाणी एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक डांगे व डीबीच्या पथकाने तात्काळ या ठिकाणी जाऊन सापळा रचला. ठरलेल्या वेळेत गणेश वायदंडे हा त्या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आला. यावेळी पथकाने त्याला रागेहात ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडुन एकुण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या गणेश वायदंडे याच्यावर कराड शहर पोलीस ठाणेस अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर पोलीस ठाणे पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे, प्रविण जाधव, सफौ. आर. देसाई, देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, पोलीस शिपाई महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ यांनी केलेली आह.