महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर पहाटेच्यावेळी कोसळली दरड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दुर्गम अशा डोंगराळ भागातील रस्त्याकडेला असलेल्या डोंगरातून दरड कोसण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोळण्याची घटना घडली. अचानक दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. प्रशासनाकडून या मार्गावरील दरड जेसीबीच्या साह्याने हटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पावसाळा आला कि डोंगराळ भागात तसेच घाटमार्गावर मातीचे ढिगारे तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. दरड कोसळल्यामुळे माती व चिखल होऊन रस्त्यावर अपघात होण्याचाही घटना घडतात. यामध्ये जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घटना घडू नये याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र, दुर्गम अशा ठिकाणी काही घटना घडतात. अशीच दरड कोसळण्याची घटना महाबळेश्वर तापोळा मार्गावरील घाटात घडली.

या मार्गावर आज पहाटेच्यावेळी दरड कोसल्यामुळे हा मार्ग ठप्प झाला. परिणामी या मार्गावरील असलेल्या चिखली व हरचंदी या गावातील लोकांना अडकून पडावे लागले. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून जेसीबीच्या साह्याने दरड हटवण्यात आली. तसेच वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.