पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी धरणाच्या उर्वरित कामास कधी सुरुवात होणार? अशी विचारणा केली जात असताना आता धरणाच्या कामासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्षात कामाला मुहूर्त लागला असून कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. धरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, काही महिन्यांतच धरणाचे काम पूर्ण होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षात असलेले मराठवाडी धरण कधी धरणग्रस्तांच्या अडचणीमुळे, तर कधी निधीमुळे चालू-बंद स्थितीत असायचे. मात्र, कंपनीने या सर्व अडचणीतून मार्ग काढत धरणाच्या कामाला गती दिली. आज धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न, निधीचा तुटवडा, बांधकासाठी जादा झालेला खर्च याची सांगड घालून कंपनीने झालेले नुकसान सोसून धरणाच्या कामात येणारे अडथळे दूर केल्यामुळेच धरणाच्या बांधकामाला गती मिळाली.
सुमारे २.७५ टीएमसी क्षमतेचे हे मराठवाडी धरण सांगली, सातारा जिल्ह्यात पुनर्वसन झालेल्या गावांना पिण्याच्या व जमिनीच्या पाण्याचा लाभ होत आहे. धरणात पुढच्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
बाहेरच्या जिल्ह्यातून वाळू केली जातेय उपलब्ध…
ज्यावेळी वांग – मराठवाडी धरणाच्या बांधकामासाठी वाळूची गरज होती, त्यावेळी कंपनीने प्रशासनाला वाळू मिळावी, यासाठी टाहो फोडला. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीयनि पाहिले नाही. उलट कंपनीने जादा बरण दराने बाहेरच्या जिल्ह्यातून वाळू उपलब्ध करून तोटा सोसून धरणाचे बांधकाम केले.