पाटणला नगरपंचायतीच्या करवसूली पथकाकडून धडक मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण नगरपंचायतीच्या वतीने पाटण शहरात विविध कर वसुली धडक मोहीम राबवण्यात येत आहे. पाटण शहरातील नागरिकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर नगरपंचायतीचे कार्यालयात अथवा आपल्याला घरी नगरपचायंतीचे कर्मचारी येतील त्याच्याकडे भरावा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करून थकबाकीदाराचे नावाचे डीजीटल फलकावर चौका चौकात लावले जातील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.

पाटण शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे नगरपंचाय‌तीच्या वतीने केली जातात. ही कामे केल्यानंतर करदात्यांकडून ठराविक कराची आकारणी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून केली जाते.

घरपट्टी आणि पाणीपट्टी करातून जमा होणाऱ्या निधीतूनवरील व इतर करातून शहरातील कमाई केली जातात. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला विविध करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक असते. पाटण शहरात विविध प्रभागातून रस्ते, गटर यासह विविध विकासकामे मोठया प्रमाणात करण्यात आलेली आहेत. तर काही ठिकाणी सुरु झाली आहेत. दरम्यान, नगरपंचायतीच्या वतीने पाटण शहरातील नागरीकांना यापूर्वी कर मागणीसंदर्भात नोटीसा देण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने काही मिळकतधारकांनी आपली कराची रक्कम भरलेली आहे. मात्र, अद्यापही काही मिळकतधारक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कर वसुली विभागातील पथकाकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे.