विद्यानगरमध्ये कारच्या धडकेत टेलर ठार; कार चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
283
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुकयातील विद्यानगर येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराड – मसूर मार्गावर गाडगे महाराज महाविद्यालयासमोर मंगळवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली.

या अपघातात सुनील गोपाळ पोरे (वय ६०, रा. राजसारथी कॉलनी, बनवडी) हे ठार झाले. तर प्रांजल अमोल शिंदे (वय २१, रा. साईगार्डनमागे, हिरकणी बंगला, विद्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी कार चालकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर बनवडी येथील राजसारथी कॉलनीत राहणारे सुनील पोरे हे कराड येथे एका बॅगच्या दुकानात टेलर म्हणून नोकरी करीत होते. दररोज सकाळी १० वाजता कामावर येऊन रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते परत घरी जात होते. सोमवारी रात्रीही काम आटोपल्यानंतर सुनील पोरे हे त्यांच्या दुचाकीवरून बनवडीकडे निघाले होते.

त्यावेळी गाडगे महाराज महाविद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक प्रांजल अमोल शिंदे (वय २१, रा. साईगार्डनमागे, हिरकणी बंगला, विद्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.