माऊलींच्या पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सर्वत्र साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात माऊलींच्या परतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. माऊलीची पालखी पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर परती सुरु झाला. परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना आज नुकतीच घडली आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या … Read more

फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

Ranjit Naik Nimbalakar News 20240724 203651 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. … Read more

राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय; सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा समावेश

Satara News 20240717 092304 0000

फलटण प्रतिनिधी | राज्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेले नागरीकरण, वाढलेली लोकसंख्या, विकासात्मक कामे, जमिनींविषयक वाढते दावे आदी कारणांमुळे राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय निर्मितीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे दाखल झाले आहेत. याला मान्यता मिळाल्यास मोठ्या तालुक्यांचे विभाजन करून तेथे अपर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय दूर होणार असून कामे गतीने … Read more

फलटणच्या माजी मुख्याधिकार्‍यांसह चौघेजण सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश

Phalatan News 20240712 091400 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात तत्कालीन मुख्याधिकारी, नगररचनाकार व दोन लिपिकांनी एका कुटुंबाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ज्या कुटुंबाची ही जमीन आहे त्यांना कोर्टात हेलपाटे मारावे लागले. प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करणार का? जे चुकीचे घडले त्याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात उपस्थित केला. दरम्यान, यावर … Read more

फलटणमध्ये उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Phalatan News 20240710 191753 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण … Read more

माऊलीची संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Phalatan News 20240705 154027 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तरडगाव येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाहणी केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे … Read more

फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई

Crime News 20240703 150019 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ४ लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी गायकवाड म्हणाले की, ”कृषी … Read more

एसीबीकडून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर 17 लाख 84 हजाराच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल

Crime News 20240702 190502 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. बारामती, जि. पुणे), असे संशयिताचे नाव आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 20240702 111215 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात व पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी डूडी … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्व, बैलांची वैद्यकीय तपासणी केली जाणार

Satara News 20240701 180715 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 ते 11 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करताना पालखीसोबत असणारे अश्व, बैल यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मार्गावर लोणंद पालखी, तळ, तरडगाव पालखी तळ, फलटण … Read more

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Phalatan News 20240701 160551 0000

सातारा प्रतिनिधी | संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित जिल्हा प्रशासनाकडून पालखी स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, फलटणचे उपविभागीय पोलीस … Read more

‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा प्रथम क्रमांक

Phalatan News 20240629 110021 0000

सातारा प्रतिनिधी | ‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा पुणे प्रदेश स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. या अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बसस्थानकास बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट … Read more