दुष्काळी परिस्थितीमुळे कोयना धरणाच्या वीजनिर्मितीवर आल्या मर्यादा; ‘इतकी’ केली जातेय वीजनिर्मिती

Koyna News 20240310 082949 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी, सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. २ हजार मेगावॅट … Read more

पाटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, कितीही आरोप केले तरी मी…

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणासह पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित सभाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्ह्णून काम करत आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी … Read more

जिल्ह्यातील धरणात पाण्याचा ठणठणाट; ‘इतके’ टक्के आहे पाणीसाठा

Satara News 72 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी … Read more

गंठण चोरी प्रकरणी चोरट्यास अटक; 1 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त

crime news 20240308 221111 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील मेष्टेवाडी येथील घरातून सुमारे १ लाख १७ हजार किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत चोरट्यास अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख १७ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अमोल किसन शिंदे (वय ३१, रा. कारवट ता.पाटण) … Read more

कोयना जल पर्यटन प्रकल्प वाढीला मिळणार चालना

Koyna News 20240307 100959 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना नदीवर हेळवाक, पाटण येथे जल पर्यटन प्रकल्प विकसीत करण्यात येणार आहे. जल पर्यटन वाढीला चालना मिळाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. . कोयना नदीचा पूर्ण प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. तीची एकूण लांबी 41 किमी असून जल पर्यटनासाठी योग्य आहे. … Read more

बोट क्लब व्यवसायिकांना सोलर बोटसाठी करणार मदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Koyna news 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला असून संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सदर प्रकल्पामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांना … Read more

डोक्यात फावडे घालून केला पत्नीचा खून; पतीला अटक

Crime News 25 jpg

पाटण प्रतिनिधी । चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात फावडे घालून तिचा निर्घृणपणे खून केल्याचाही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मंदिरातील दर तासांनी वेळेची सूचना देणारी घंटा गेली चोरीस

Karad News 52 jpg

कराड प्रतिनिधी । आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी मोठी घंटा लागते. अशीच एक वेगळी घंटा चोरीस गेल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे कि जी दर तासांनी वेळेची सूचना देत होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यास ताब्यात घेतले आहे. चाफळ (ता. पाटण) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे दहा किलो वजनाची पूर्वापार वापरात … Read more

पाटणची जनता पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठाम राहिल – सारंग पाटील

Karad News 47 jpg

पाटण प्रतिनिधी | निवडणूक म्हणजे विचारधारा आणि तत्वाची लढाई असते. या लढाईत पाटणची जनता निष्ठा आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.     काळोली (ता.पाटण) येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मंजूर झालेल्या सभामंडप कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते … Read more

मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : दिग्विजय पाटील

Patan News 3 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मान्याचीवाडी, ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावर नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मधकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल. शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेली … Read more

जिल्ह्यातील ‘या’ निवडणूकीत एका चिठ्ठीनं शरद पवार गटानं केला शिंदे गटाचा पराभव

Patan News 2 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघ म्हंटल की तो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. त्यांना या मतदारसंघात कुणीच लोणत्याही निवडणुकीत पराभूत करू शकत नाही, असा मंत्री देसाई यांचा विश्वास असल्याचे बोलून दाखवले जाते. मात्र, त्यांच्या एका गटाचा एका निवडणुकीत पराभव झाला आहे. आणि … Read more

गोठणेत रानगव्याच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता. रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा … Read more