तारळे अत्याचार प्रकरणातील मोकाट आरोपीला तातडीने अटक करा : शिवसेना उपनेत्या छाया शिंदे

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील तारळे येथील एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तेथीलच दोन सख्ख्या भावांवर विनयभंग व अत्याचार हा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी दुसरा मात्र मोकाट फिरत आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावापोटी त्या संशयिताला अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया … Read more

साताऱ्यात आढळले तब्बल 20 हजार ‘कुणबी’; पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये ‘इतक्या’ नोंदी!

20231110 083214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन करत सरकारला झुकायला लावले. त्यांच्या आंदोलनानंतर प्रत्येक जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध घेण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे. तालुकास्तरावर नेमलेल्या समितीकडून या कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल २० हजार २ कुणबी नोंदी सापडल्या असून सर्वाधिक नोंदी पाटण व सातारा तालुक्यात … Read more

साताऱ्यासह कराड, पाटणला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना आज पहाटे साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला असून ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही या … Read more

सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण; कराड तालुक्यात खा. शरद पवार गटाचा डंका

Sharad Pawar News 20231106 143416 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतसाठी मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार गट, अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याकडून आपापले उमेदवार उभे करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असलेल्या कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद … Read more

सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला

Karad Elections News 20231105 132918 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. त्यामधील तब्बल 42 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या, तर 24 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 64 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक, तर 14 गावांत निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस दलातर्फे संवेदनशील … Read more

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला; धरण पूर्णपणे सुरक्षित

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १० किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस ७ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली असल्याची … Read more

सांगलीकरांच्या मागणीनंतर कोयना धरणातून 1050 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू

Koyna News 20231027 152849 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई भासत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नसले तरी सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला आहे. … Read more

नवारस्ता चौकात उभारणार छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; यशराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

Yasharaj Desai News 20231019 235559 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी नवारस्ता (ता. पाटण) येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प आपल्या वाढदिनी केला होता. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार यशराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती गठीत करण्यात आली आहे. पाटण … Read more

ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार; देसाईंचा इशारा

Shambhuraj Desai News 20231019 093230 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. माझा कोणताही संबंध आढळल्यास आपण राजकारण सोडू, असा खुलासा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. सुषमा अंधारेंनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य चोवीस तासात मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या … Read more

कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, कोणतीही हानी नाही

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात परिसरात सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. … Read more

पोलिस फौजफाट्याला न जुमानता धरणग्रस्तांची धरण फोडण्यासाठी पळापळ; पुढं घडलं असं काही…

Chiteghar Sakhri Project News jpg

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील चिटेघर-साखरी प्रकल्पग्रस्तांनी रखडलेल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलिस फौजफाट्याला व प्रशासनाला न जुमानता महिला व पुरुष धरणग्रस्तांनी बॅरिकेड्स ढकलून धरणाच्या दिशेने धावत पळत जाऊन धरण फोडण्यासाठी धावपळ केली. अचानक केलेल्या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडून गेला. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांना मदतीला घेऊन प्रकल्पग्रस्तांना अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धरणस्थळी संबंधित विभागाच्या … Read more

उत्पादन शुल्क मंत्री देसाईंच्या तालुक्यातच सापडला 20 लाखांचा विदेशी मद्यसाठा; 3 जणांना अटक

20231012 191508 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर आज धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील गोषटवाडी हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चारचाकी वाहने, असा 19 लाख 75 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ … Read more