राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाटोळेतील पहिल्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रकल्प आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Shambhuraj Desai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांची क्षमता वृद्धी … Read more

कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक … Read more

अदानींच्या ‘त्या’ प्रकल्पाच्या जनसुनावणीत नागरिक आक्रमक

Gautam Adani 20240313 102446 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तारळे विभागातील कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित गौतम अदानी ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत काल प्रकल्पच्या ठिकाणी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून प्रकल्पास तीव्र विरोध केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काल मंगळवारी प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी कळंबे … Read more

पालकमंत्री देसाईंनी मतदारसंघात घेतला जनता दरबार; प्रत्येक अर्जांवर 2 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

Patan News 20240311 070936 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण पंचायत समिती येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस … Read more

दुष्काळी परिस्थितीमुळे कोयना धरणाच्या वीजनिर्मितीवर आल्या मर्यादा; ‘इतकी’ केली जातेय वीजनिर्मिती

Koyna News 20240310 082949 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी, सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. २ हजार मेगावॅट … Read more

पाटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, कितीही आरोप केले तरी मी…

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणासह पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित सभाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्ह्णून काम करत आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी … Read more

जिल्ह्यातील धरणात पाण्याचा ठणठणाट; ‘इतके’ टक्के आहे पाणीसाठा

Satara News 72 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी … Read more

गंठण चोरी प्रकरणी चोरट्यास अटक; 1 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त

crime news 20240308 221111 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील मेष्टेवाडी येथील घरातून सुमारे १ लाख १७ हजार किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत चोरट्यास अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख १७ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अमोल किसन शिंदे (वय ३१, रा. कारवट ता.पाटण) … Read more

कोयना जल पर्यटन प्रकल्प वाढीला मिळणार चालना

Koyna News 20240307 100959 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना नदीवर हेळवाक, पाटण येथे जल पर्यटन प्रकल्प विकसीत करण्यात येणार आहे. जल पर्यटन वाढीला चालना मिळाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. . कोयना नदीचा पूर्ण प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. तीची एकूण लांबी 41 किमी असून जल पर्यटनासाठी योग्य आहे. … Read more

बोट क्लब व्यवसायिकांना सोलर बोटसाठी करणार मदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Koyna news 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला असून संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सदर प्रकल्पामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांना … Read more

डोक्यात फावडे घालून केला पत्नीचा खून; पतीला अटक

Crime News 25 jpg

पाटण प्रतिनिधी । चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात फावडे घालून तिचा निर्घृणपणे खून केल्याचाही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मंदिरातील दर तासांनी वेळेची सूचना देणारी घंटा गेली चोरीस

Karad News 52 jpg

कराड प्रतिनिधी । आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी मोठी घंटा लागते. अशीच एक वेगळी घंटा चोरीस गेल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे कि जी दर तासांनी वेळेची सूचना देत होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यास ताब्यात घेतले आहे. चाफळ (ता. पाटण) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे दहा किलो वजनाची पूर्वापार वापरात … Read more