शिंगमोडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय जागीच ठार

Crime News 37

पाटण प्रतिनिधी । डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपात घुसलेल्या बिबट्याने गायीवर अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पाटण तालुक्यातील शिंगमोडेवाडी बनपुरी येथे घडलेल्या या हल्ल्याची घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार होण्याची येथील गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील … Read more

कोयना, चांदोली धरणात ‘इतका’ आहे पाणीसाठा!

Koyna News 20240511 110706 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात २८.३९, तर चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी … Read more

रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर झाला हल्ला; 70 जण गंभीर जखमी

Dhebewadi News 20240510 191444 0000

पाटण प्रतिनिधी | रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची घटना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील मराठवाडी येथे गुरुवारी घडली. या हल्ल्यामध्ये तब्बल ७० जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ढेबेवाडी भागातील मराठवाडी गावात नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी जवळ काही नागरिक गुरूवारी रक्षा विसर्जन … Read more

पाटण तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

Patan News 20240502 113806 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे या योजनेचा लाभ घेवून मतदान केले. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला. या दोन्ही प्रवर्गाच्या 138 मतदारांनी मतदान करुन मतदानाची प्रक्रिया घरपोच मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले. पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी 224 ज्येष्ठ नागरिक व 53 … Read more

शशिकांत शिंदेंना अटक झाली तर…; पाटणच्या भर सभेत शरद पवारांचं मोठं विधान

Patan News 20240427 184155 0000 jpg

पाटण प्रतिनिधी । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला, ‘इतका’ टीएमसी शिल्लक आहे पाणीसाठा

Koyna News 20240426 115759 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३१०० क्यूसेक पाणीसांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे दुष्काळाचे सावट सर्वत्र आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडला … Read more

आश्वासने देऊन खोऱ्यानं मते घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी जनतेकडं दुर्लक्ष केलं; उदयनराजेंचा हल्लाबोल

Udayanraje Bhosale News 20240425 190839 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. निवडून आल्यानंतर मात्र जनतेकडं साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या भाजप सरकारच्या हाती सत्ता देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, गुढे येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सत्तेत असताना धरणांची कामे का केली नाहीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या … Read more

गिरेवाडीतील अपघातात एकजण जागीच ठार

Accident News 20240425 061808 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ आठवडा बाजारास येताना चार वाजण्याच्या सुमारास गिरेवाडी (ता.पाटण) जवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीत गाडी घसरून ट्रॅक्टरखाली गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. दिपक शंकर काटकर (वय ५५, रा. बेलदरे ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलदरे गावाहून मल्हारपेठ बाजारास येताना गिरेवाडी गावाजवळ चौपदरी रस्त्याच्या मध्यमागी … Read more

सणबूरमध्ये कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला;15 जण जखमी

Sanbur News 20240423 131503 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील सणबुर येथील कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात कुस्ती मैदानातील पैलवानांसह १५ जण जखमी झाले, तर कुस्त्या पाहायला आलेल्या अनेकजणांना चावा घेतल्याने जखमी झाले. जखमींना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सणबूर (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त रविवार सायंकाळी आयोजित कुस्तीच्या मैदानावर आग्या … Read more

सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग वाढवला; धरणात ‘इतका’ राहिला पाणीसाठा शिल्लक

Koyna Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यामुळे येथील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता १२०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा वीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून ३ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात सध्या … Read more

चालकाचा ताबा सुटल्याने अल्टोची आयशरला भीषण धडक; पाचजण गंभीर जखमी

Car Accident News jpg

पाटण प्रतिनिधी । कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गालगत पाटण तालुक्यातील तामकडे गावच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जॅकवेलनजीक अल्टो कार व आयशरची भीषण धडकी झाली. खेर्डीच्या (चिपळूण) दिशेने निघालेल्या अल्टोवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने विरूध्द दिशेला जाऊन कराडच्या दिशेने निघालेल्या आयशर माल वाहतूक ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात अल्टोमधील ५ जण गंभीर जखमी झाले … Read more

कोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी; एकजण बुडाला तर दोघे पोहत बाहेर आले

Patan News 20240418 215729 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला, मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. कामाची पाहणी … Read more