पाटणचा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; स्थानिकांना दिले बोट चालवण्याचे प्रशिक्षण

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टीच्या काळात पाटण तालुक्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. त्यामुळे पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. अनेकजण पुराच्या पाण्यात अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाटणमधील स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापन … Read more

जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध डावलून ‘अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट’चं काम सुरू; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

Gautam Adani News 20240529 221145 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक लोकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरीकांमधून संताप … Read more

दहावीच्या परीक्षेत मिळवले 100% गुण; अदितीचा खा. श्रीनिवास पाटलांनी केला सत्कार

Srinivas Patil News

कराड प्रतिनिधी । आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले. पाटण तालुक्यातील हावळेवाडी गावातील अदिती मनोज हावळे हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. याबद्दल … Read more

सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर साधला निशाणा; म्हणाल्या की,

Political News 1

सातारा प्रतिनिधी । पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाकडून केल्या जात असलेल्या हप्ते वसुलीचा पाढाच अंधारे व धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या समोर वाचून दाखवला. अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सध्या ‘इतके’ TMC आहे पाणी

Koyna News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा मे महिना अखेर कमी झाला असून तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही पाणी पुरेल असता अंदाज आहे. कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गणनेवेळी 16 प्रकारच्या सस्तन प्राणी अन् 200 वन्यप्राण्यांचे दर्शन

Sahayadri News 20240526 203457 0000

कराड प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ८१ मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी निसर्ग प्रेमींना मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाशात पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकूण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप … Read more

Koynanagar Tourism : कोयनानगरला फिरायला निघालात? ‘या’ टॉप 7 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Koynanag News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये खास करून पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात. तुम्ही जर निसर्गाने नटलेल्या पाटण तालुक्यातील कोयनानगरसह इतर ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर येथील 7 ठिकाणांना नक्कीच भेट द्या. कारण या ठिकाणांना खास महत्व आहे. 1) कोयना अभयारण्य (Koyna Garden) सातारा जिल्हयाच्या पश्चिम भागात कोयना … Read more

धोकादायक वळणावर दिवशी घाटात अचानक कोसळली दरड

Patan News

पाटण प्रतिनिधी । ढेबेवाडी – दिवशी घाटात जुळेवाडीकडून ढेबेवाडीकडे दुचाकीवरून येत असताना दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूच्या धोकादायक वळणावर अचानक दरड कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यामध्ये असवलेवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी गंभीर जखमी झाला. जयवंत बाळकू चव्हाण (वय ५५, असवलेवाडी, ता. पाटण) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती की, पाटण तालुक्यातील असवलेवाडी … Read more

जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सोमवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलेच नुकसान केले. कराड, पाटण तालुक्यात पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी … Read more

कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

Patan News

पाटण प्रतिनिधी । सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे सोमवार दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता नदी विमोचक (स्ल्यूस गेट) द्वारे होणारा एक हजार क्युसेक विसर्ग कमी करून ५०० क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक विसर्ग असा एकूण २६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून … Read more

वादळी पावसात झाडाखाली थांबणं जीवावर बेतलं, अंगावर वीज पडून क्रिकेट खेळाडूचा जागीच मृत्यू

Crime News 20240519 220601 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वळीव पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गारपिट झाली आणि अंगावर वीज पडून माण तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी पाटण तालुक्यातील मुट्टलवाडी-काळगाव येथे क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रोहन डांगे (वय २३, रा. हा … Read more

वनवासवाडी, कोळेकरवाडी शिवारात रानगव्यांच्या कळपांचा वावर; पिकांचे नुकसान

Wild Cattle News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा … Read more