युवकाच्या खून प्रकरणी आणखी दोघांना अटक; 5 दिवस पोलीस कोठडी

Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात पूर्वीच्या झालेल्या वादाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा वडोली निळेश्वर येथील युवकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मुबिन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड), रिझवान गौस शेख … Read more

उसने दिलेले पैसे मागितले; ‘नाही’ म्हणाला म्हणून ‘त्यानं’ भोकसलं; घटनेमुळं पाटण हादरलं

Patan Crime News jpg

पाटण प्रतिनिधी । उसने दिलेले 5 हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंडित बाबुराव चव्हाण (वय 52, रा. कडववाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिकेत मारूती … Read more

सालपे खून प्रकरणी दोघांना जन्मठेप अन् 10 हजाराचा दंड

Crime News 20231201 092608 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सालपे, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात सुमारे दोन वर्षापूर्वी एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सालपे येथे दि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लोणंद- सातारा रस्त्यावरील … Read more

आईवरून शिवी दिली म्हणून त्याचा कायमचाच केला बंदोबस्त; दोघा जणांना अटक

Crime News 20231127 141923 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भुईंज येथील हमालाच्या खुनाचे गुढ उकलले असून आईवरून शिव्या दिल्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल नामदेव कुचेकर (वय 35, रा. मातंगवस्ती भुईज) याचा अज्ञातांनी दांडक्याने व दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रोहित … Read more

राजमाची खून प्रकरणी आणखी तिघांना अटक; फरार आरोपींचा शोध सुरु

Crime News 20231104 091433 0000 jpg

कराड प्रतिनिधी । प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एक जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली … Read more

साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला; 2 महिन्यानंतर उघडकीस आली घटना

Satara Police News

सातारा प्रतिनिधी | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

अर्धवट मृतदेह जाळलेल्या तरूणाची ओळख पटली; कर्नाटकातील तिघांचा हत्येत सहभाग, एकास अटक

Crime News 20231002 231119 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटली असून केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू), असे त्याचे नाव आहे. कराड DYSP अमोल ठाकूर यांचे पथक आणि तळबीड पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. केशवमुर्तीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात … Read more

Crime News: फलटण खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Phaltan Crime News 20230924 233519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर पोलीस स्टेशन येथे सुमारे 6 दिवसापुर्वी खुनाच्या गुन्ह्याची घटना घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीस असलेल्या दुसऱ्या आरोपीस फलटण ग्रामीण पोलीसांनी शिताफीने पकडले. राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हदीमध्ये दिनांक १९/०९/२०२३ रोजी विडणी ता. … Read more

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी ‘त्यानं’ कट रचून संपवलं तिच्या पतीला; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20230921 185903 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्या च्या साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालवामध्ये टाकल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीने तपास करुन मृताच्या पत्नीस अन् तिच्या प्रियकराला अटक केली. अद्याप एकजण फरार आहे. याबाबत अधिक माहिती … Read more