पैसे दुप्पट करून देतो असे सांगत नागरिकांची सुमारे 31 लाखांची फसवणूक करणाऱ्या सराफ दांपत्यास अटक

Crime News 20240620 110711 0000

सातारा प्रतिनिधी | पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून खंडाळा तालुक्यातील नागरिकांची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचा मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम यांना खंडाळा पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या दाम्पत्य विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यापासून खंडाळा … Read more

खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायचा होता प्लॅन, मोक्याच्या क्षणी एन्ट्री मारून पोलिसांनी चौघांना केलं जेरबंद

Crime News 20240615 210204 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची … Read more

खंडाळ्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान; जनावरे होरपळली

Crime News 26 1 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी घडली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीमध्ये शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या आहेत. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर … Read more

खंडाळा तालुक्यात 3 लाख 33 हजार रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त

Crime News 20240225 100501 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 33 हजार 250 रुपये किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या … Read more

पार्सलमधील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक; 41 मोबाईलसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 37 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीतील इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या पार्सलमधील महागड्या मोबाईलसह अन्य साहित्याची चोरी झाली होती. कर्मचारीच या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निघाला असून पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकास अटक केली आहे. चोरीस गेलेल्या एकूण १२ लाख २० हजार रूपयांच्या मुद्देमालापैकी ६ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ४१ … Read more

संस्कारला गाडीची रेस करणं पडलं जीवानिशी; स्कुटीसकट भिंतीवर जाऊन आपटला अन्…

Crime News 25 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या तरुणांमध्ये दुचाकी रेस लावण्याचे प्रमाण भलतेच वाढले आहे. एखादा सुनसान रस्ता सापडला आठ महामार्गावरून जाताना दुचाकीची रेस लावून ती पळण्याची हौस त्याच्याकडून पूर्ण केली जात आहे. मात्र, हे करत असताना तीच हौस जीवावरही बेतत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे घडली. खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण … Read more

पुणे – बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघातात 2 मालट्रकसह 5 वाहनांना धडक

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे भरधाव वेगातील एका ट्रकने दोन मालट्रकसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात सहा वाहने व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या … Read more

‘त्यानं’ चुलत भावाचाच काढला काटा; पुरावा नष्ट करताना केलेल्या एका चुकीमुळं अडकला जाळ्यात

Satara News 19 1 jpg

सातारा प्रतिनिधी । शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही भयंकर घटना खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहिरे (ता. खंडाळा) येथील शेरी नावाच्या … Read more

खंडाळ्यातील रास्तारोको प्रकरणी 200 आंदोलकांवर गुन्हा

Crime News 20231204 101806 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे सातारा जिल्हयातील खंडाळा येथे दि. 1 रोजी मोर्चा काढून पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आता 200 हून अधिक आंदोलकांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिसांनी दिलेले आदेश न मानता आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून … Read more

माहिती न देणं पडलं महागात; ग्रामविकास अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड

Shirval Grampachayat News 20231008 095519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आल्यास तो कामावर असताना त्याला त्याच्याकडे माहिती मागायला आल्यास ती देणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांना माहितीच दिली जात नाही. नंतर त्याचा चांगला परिणाम त्या अधिकारी, कर्मचाऱ्यास सहन करावा लागतो. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये घडली. येथील ग्रामविकास अधिकारी … Read more

Satara News : खंबाटकी घाटातील वाहतूक पुन्हा कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक … Read more

पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; खंबाटकी बोगदाबाहेर आढळला मृतदेह

Crime News 20230923 091603 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याबाहेर आढळून आला आहे. ध्रुव स्वप्नील सोनवणे (वय १९, रा. बावधन, पुणे), असे त्याचे नाव आहे. पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. खंबाटकी बोगद्यातून बाहेर पडताना झालेल्या अपघातात तो ठार झाला आहे. ध्रुव सोनवणे हा दि. १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटूंबीयांनी हिंजवडी, पुणे येथे ध्रुव बेपत्ता … Read more