मुंढे गावातील बंब चोरणाऱ्या संशयितास डीबी पथकाने केली अटक, तांब्याचे 5 बंब जप्त

Crime News 20240202 081020 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंढे (ता. कराड) येथील पाण्याचे बंब चोरणाऱ्या संशयीतास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकले आहेत. आरिफ अब्दुल खलिद शेख (वय 40, रा. खाज्या झोपडपट्टी, मिरज, जि. सांगली), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तांब्याचे पाच बंब आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, असा 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

तडीपार असताना वावरत होता गावात, डीबी पथकाने पाठलाग करून पकडले भर चौकात

Crime News 20240131 070329 0000 jpg

कराड प्रतिनिधी | दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला संशयित लपून छपून गावात वावरत असल्याची माहिती मिळताच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयिताला पाठलाग करून भर चौकात पकडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देवेंद्र अशोक येडगे (रा. जखिणवाडी, ता. कराड), असे संशयिताचे नाव आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आरोपी देवेंद्र अशोक येडगे (रा. … Read more

दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस? असे म्हणत तिघांचा एकावर कोयत्याने वार, पोलिसांनी लावला मोक्का

Crime News 33 jpg

कराड प्रतिनिधी । जेवण करून निघालेल्या एकास हजारमाची व ओगलेवाडी येथील तिघा जणांनी दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस, तुला मस्ती आली आहे का? असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित टोळीतील दोघाजणांसह एका साथीदारांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. १) सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय ३३ … Read more

कराड तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणारी 7 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240123 195457 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाया ७ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १) शुभम शंकर काकडे, (वय २४, रा. शिवाजीनगर मलकापुर, ता. कराड जि. सातारा) तसेच टोळी सदस्य २) समीर ऊर्फ सॅम नुरमोहंमद मोमीन, (वय २९, रा. मुजावर कॉलनी, ता. कराड जि. सातारा) … Read more

कराडची बुधवार पेठ स्फोटाने हादरली, गॅस शेगडीच्या ज्वाळांनी कपडे पेटल्याने 6 जण भाजले

Karad News 20240118 070008 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शहरातील भर वस्तीतील बुधवार पेठेत बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एका घरात स्फोट झाला. या घटनेत सहा जण भाजले आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याची वार्ता शहरभर झाली अन् प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, हा सिलेंडरचा स्फोट नसून पंख्याचा कंडेंसर तापून फुटल्याने मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजामुळे छोट्याशा खोलीतील लोक हडबडले … Read more

विरोधात तक्रार केल्याने 3 जणांनी एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत केली मारहाण

20240114 092742 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत सतनाम एजन्सीचे मॅनेजर निखिल बलराम पोपटानी (वय 35, रा. मलकापूर) यांच्या डोक्यात कोयत्याने वार आणि हॉकी स्टिक, दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उमेश चंदवानी, अनिल चंदवानी … Read more

शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

Crime News 20240112 094620 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील शरद … Read more

शरीराविरूद्ध गुन्हे करणारी 2 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240111 153526 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे … Read more

पालकमंत्री देसाईंविरोधात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची अश्लील पोस्ट; गुन्हा दाखल

Crime News 20240108 091756 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटातील तालुकाप्रमुखाने एक पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणी तालुका प्रमुखावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप … Read more

कराडच्या व्यावसायिकाला 90 लाखांचा गंडा; दोघा भावांवर गुन्हा दाखल

20240108 083416 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कराड येथील व्यावसायिक सूरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ) यांना तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीनकुमार सावंत आणि महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या सख्ख्या भावांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

कराड पोलिसांनी गहाळ झालेले 18 मोबाईल शोधून केले परत

20240107 091818 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन वर्षाची अनोखी भेट शनिवारी मोबाईल मालकांना देण्यात आली. मालकांचे चोरीस गेलेल्या 18 मोबाईलचा शोध घेऊन मुळ मालकांना परत करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यास सन 2022-2023 पासून नागरिकांचे वापरात येणारे मोबाईल फोन ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

Crime News 21 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड … Read more