ओगलेवाडीत चोट्यानी घरफोडी करत तब्बल 110 तोळे सोने केले लंपास

Crime News 20241105 084845 0000

कराड प्रतिनिधी | लक्ष्मीपूजनानिमित्त घरात आणलेले सुमारे 110 तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात घडली आहे. एका उद्योजकाचे बंद घर फोडून हा चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास ठोकल्या बेड्या; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Karad News 8

कराड प्रतिनिधी । मलकापूर-आगाशिवनगर येथे गेल्या काही महिन्यांपासून घारफोड्याचे सत्र सुरु होते. दरम्यान, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा … Read more

कारमधून 1 कोटी 40 लाखांची रक्कम लुटल्याचा बनाव, CID हवालदारासह कार चालकच निघाला आरोपी

1001007347

कराड प्रतिनिधी | कराडजवळ हवालाची तीन कोटींची रक्कम लुटल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. त्याच्याशी साधर्म्य असणारी आणखी एक घटना पाचवड (ता. वाई) येथे महामार्गावर घडली. परंतु, रक्कम लुटीचा बनाव भुईंज पोलिसांनी अवघ्या तीन तासात उघडकीस आणला. कोल्हापुरातील व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कोल्हापूरला घेऊन जाताना सातारा जिल्ह्यातील पाचवड (ता. वाई) हद्दीत ती अज्ञातांनी … Read more

कारमधून हवालाचे 3 कोटी लुटणाऱ्या टोळीतील 10 जणांना अटक, सहा दिवस पोलीस कोठडी

Crime News 20241017 222923 0000

कराड प्रतिनिधी | मुंबईहून हुबळीला हवालाची रक्कम घेऊन निघालेल्या कारमधील ३ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण लुटलेल्या रक्कमेतील अर्धी रक्कम पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह १० जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर … Read more

कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, निम्मी रोकड, वाहनांसह 2 संशयित ताब्यात

Crime News 25

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा कराडमधील असून तो रेकॉर्डवरील गुंड आहे. तसेच अन्य काही संशयित कोयना काठच्या गावातील आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने, लुटलेल्या रक्कमेतील निम्मे पैसे आणि दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्य संशयिताच्या तपासासाठी … Read more

कराडजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 5 कोटींची रक्कम लुटली, संशयितांची धरपकड सुरू

Karad News 20241015 214600 0000

कराड प्रतिनिधी | मलकापूरातील ढेबेवाडी फाटा येथे शस्त्रधारी पाच जणांच्या टोळक्याने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. लुटलेली रक्कम हवाला मार्फत मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून मोठ्या रकमेची लूट होवूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. फिर्यादीकडेही कसून … Read more

मलकापूरात युवकांमध्ये जोरदार राडा; मारामारीत युवकावर चाकू हल्ला

Crime News 24

कराड प्रतिनिधी । युवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना कराड नजीक असलेल्या मलकापूर शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात रविवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या भांडणात दोन युवकांवर चाकूने वार करण्यात आले. तर एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन कारची काच फोडण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

कराडात 36 जणांवर पोलिसांची कारवाई; 5 दुचाकीसह 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 20241011 202510 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर गुरुवारी सायंकाळी डीवायएसपी पथकाने छापा टाकला. यामध्ये 36 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह सुमारे तीन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, … Read more

कराड उत्तरमध्ये एकाच व्यक्तीची तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्जांद्वारे मतदार नोंदणी, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Karad News 20241009 063131 0000

कराड प्रतिनिधी | गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना साताऱ्यातील वडूजमधून समोर आली होती. आता मतदार नोंदणीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला … Read more

कराडात रिक्षांना आता ‘क्यूआर कोड’; महिला, युवतींना मिळणार रिक्षाची माहिती

Karad News 41

कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस … Read more

विद्यानगरमध्ये मद्यधुंद युवकांची कॉलेजसमोर हुल्लडबाजी; पोलिसांनी पाठलाग करून दारूच्या बाटल्यासह पकडले

Karad Crime News 20240925 124617 0000

कराड प्रतिनिधी । सध्या कराडच्या महाविद्यालय परिसरात युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. दरम्यान, काही मद्यधुंद युवकांनी विद्यानगर येथील एका विद्यालयाच्या आवारात कार घालून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. पोलिस पोहोचल्यानंतर त्यांनी तेथून कारसह पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून या युवकांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर परिसरात मंगळवारी दुपारी … Read more

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली अकरा लाखांची फसवणूक

Karad Crime News 20240924 111956 0000

कराड प्रतिनिधी | दोन ट्रॅक्टर मालकांची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली मुकादमाने अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुकादामावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवे मालखेड, ता. कराड येथील ट्रॅक्टर मालक शशिकांत सुभाष मारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अनिल बंडू धोत्रे (रा. ताकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) या मुकादमावर गुन्हा दाखल झाला … Read more