वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’नं झोडपलं; शेती पिकांसह घरांचे लाखो रुपयांचे नुकसान

Karad News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत खांबावर वृक्षांच्या फांद्या कोसळल्या तर … Read more

10 लाखांचा गुटखा जप्त; कराड तालुका पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20240519 145847 0000

कराड प्रतिनिधी | घोगाव (ता. कराड) गावच्या हद्दीत सुमारे १० लाखांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतला. ही कारवाई शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 9 लाख 64 हजार 900 रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख … Read more

ATM जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणारी 5 जणांची टोळी जेरबंद

Crime News 20240519 140559 0000

कराड प्रतिनिधी | उंब्रज व तळबीड पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणार्‍या 5 जणांच्या टोळीला शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलानजीक सापळा रचून पकडले. या टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वैभव राजेंद्र साळुंखे (वय ३३), ओमकार बाळासाहेब साळुंखे (वय २३), आदित्य संतोष जाधव (वय १९, सर्व रा. मोळाचा … Read more

कराडात चोरीस गेलेले 25 मोबाईल हस्तगत; शहर पोलिसांची दमदार कामगिरी

Karad Crime News 20240519 111657 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेसह शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले तब्बल २५ मोबाईल कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले. सुमारे ५ लाख २० हजारांचे हे मोबाईल आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड़ अमोल … Read more

सुट्टीवर आलेल्या कार्वे गावचे जवान अमोल थोरात यांचा अपघाती मृत्यू

Crime News 6

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र व भारत तिब्बत सिमा पोलीस दलातील जवान अमोल प्रल्हाद थोरात (वय ३२) या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कार्वे गावावर शोककळा पसरली आहे. जवान अमोल थोरात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गोटे हद्दीत महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव एसटीची धडक: अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

Crime News 5

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत दुभाजकाच्या झाडीतून घाईगडबडीत महामार्ग ओलांडताना भरधाव एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. सोमवारी दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. बंटीराज बल्लाळ (रा. तांबवे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघातस्थळ व पोलिसांकडून … Read more

वनवासवाडी, कोळेकरवाडी शिवारात रानगव्यांच्या कळपांचा वावर; पिकांचे नुकसान

Wild Cattle News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा … Read more

विहिरीचा भाग कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू, तीन कामगार बचावले

Karad News 20240515 104614 0000

कराड प्रतिनिधी | उत्तरमांड नदीच्या काठावर विहिरीची सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू असताना एका बाजूची पडदी अचानक कोसळून ढिगाऱ्याखाली गाढले गेलेल्या चार कामगारातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित तीन कामगार बचावले असल्याची घटना मंगळवारी घडली. कराड तालुक्यातील भवानवाडी येथे घडलेल्या घटनेमुळ हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील भवानवाडीत … Read more

पाचव्या दिवशीही वळीवाची हजेरी : दुष्काळी माण तालुक्यात पाणीच पाणी तर कराडात विजांचा कडकडात

Satara Karad News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वळवाचा पाऊस कोसळत असून आज सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. दुष्काळी माण तालुक्यातही मंगळवारी दुपारीनंतर चांगला पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सातारा येथील पोवई नाक्यावर महाकाय झाड अवकाळी पावसामुळे … Read more

किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत परप्रांतीय युवकाचा खून; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Crime News 1

कराड प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून २ परप्रांतीय कामागारात झालेल्या शाब्दीक वादावरून एकचा खून झाल्याची घटना काल सोमवारी रात्री कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अन्य एका परप्रांतियास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस व घटना स्थळावरून मिळालेलया माहितीनुसार, छत्तीसगड येथून मजुरी कामासाठी काही कामगार भोसलेवाडी येथे आले. त्या कामगारामध्ये काल सोमवारी रात्री मारामारी झाली. … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

रखरखत्या उन्हात ‘त्यांनी’ काढला हक्काच्या घरकुलासाठी कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित कुटुंबाना घरकुल मिळनेबाबत तसेच घरकुलाच्या अनुदान मागणीसाठी आज घरकुल संघर्ष समितीच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रखरखत्या उन्हात कराड तालुक्यातील नागरिक, महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी … Read more