कराडात डॉ. अतुल भोसलेंच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना कराड शहरासह ग्रामीण भागात मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. ही निवडणूक महिला आणि युवावर्गाने हातात घेतली आहे. या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांचा विजय निश्चित असून, या विजयात कराडकरांचा वाटा मोलाचा राहील, अशी खात्री य मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केली.

कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खासदार भगवंत खुबा, आमदार श्रीकांत कुलकर्णी, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, श्रीरंग देसाई, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी नगरसेवक आप्पा माने, सुहास जगताप, महादेव पवार, विजय वाटेगावकर, विनायक पानस्कर, रणजित पाटील, मुकुंद चारेगावकर, एकनाथ बागडी, शुभम लादे, सुलोचना पवार, बापू घराळ, गिरीश शहा, विष्णू पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, स्वाती पिसाळ, जय शहा, भरत पाटील, अजय पावसकर, भारत जंत्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कराड शहर हे सातारा जिल्ह्यात प्रगत असणारे शहर आहे. या शहराचा आणि एकूणच कराड दक्षिणचा विकास व्हावा, यासाठी गेल्या वर्षभरात डॉ. अतुलबाबांनी चांगले प्रयत्न केले आहेत. विशेषतः स्टेडियम, वाखाण रोड, पाईपलाईन दुरुस्ती, दैत्यनिवारणी मंदिर संरक्षण भिंत अशा कामांसाठी कोट्यवधींचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आणण्यात अतुलबाबा यशस्वी झाले आहेत. येत्या काळात राज्यातील मोठी बाजारपेठ याठिकाणी उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील म्हणाले, या निवडणुकीत अतुलबाबांच्या रूपाने नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे. अतुलबाबांनी गेल्या अडीच वर्षात कराडच्या विकासाला गती दिली. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, जैन समाज संघाचे कांतीलाल जैन यांनी मार्गदर्शन केले.