खरीप हंगामासाठी मुदतीत पीक कर्जाचे वितरण करा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे बँकांना निर्देश     

Collector Jitendra Dudi 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये पतपुरवठामध्ये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटींचे असून खरीप हंगामासाठी 2 हजार 520 कोटीचे पीक वितरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 15 जुलै अखेर 1 हजार 396 कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. बॅकांनी विहित मुदतीत खरीप पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी … Read more

एकीव धबधब्यावरील खूनाचा गुन्हा पोलिसांकडून 72 तासांत उघड; 3 जणांना अटक

Murder Case at Ekiv Falls

कराड प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील 700 फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आता तब्बल 72 तासानंतर खुनातील 3 आरोपींचा शोध घेत मेढा पोलिसांनी … Read more

कराडच्या विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; पृथ्वीराजबाबांनी भर सभागृहात मानले धन्यवाद

Devendra Fadnavis Karad Airport Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी राज्यातील 28 विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित झालेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील 28 विमानतळांसह कराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली … Read more

चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा

Case Of Rape Little Girl News (1)

कराड प्रतिनिधी । अल्पवयीन 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात रूवले (ता . पाटण) येथील आरोपीला कराडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. व्होरे यांनी आज फाशीची शिक्षा ठोठावली आहे. २०२१ साली ढेबेवाडी खोऱ्यातील रूवले गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. कराड न्यायालयाच्या इतिहासात फाशीची शिक्षा … Read more

पाटण तालुका हादरला ! एकाच कुटूंबातील 4 जणांचे घरात आढळले मृतदेह

Sanbur Crime News

कराड प्रतिनिधी । पावसामुळे ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना पाटण तालुक्यातील सणबूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह घरामध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आलेले आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबियांमध्ये आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी अशा सदस्यांचा … Read more

Crime News : एकीव धबधब्यातील घटनेप्रकरणी 5 संशयित ताब्यात

WaterFolls News

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून करण्यात आला होता. हा प्रकार प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला केला. होता. दरम्यान या घटनेतील संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला … Read more

सातारच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण

Satara Jawan Vijay Kokare

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांच्या वीरमरणाने परळी परिसर शोकसागरात बुडाला आहे. परळीतील जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. 2017 मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण … Read more

दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

satara collector Jitendra Dudi

सातारा प्रतिनिधी । दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गडे, तहसीलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित … Read more

Satara Rain Update : साताऱ्यात पावसाचा कहर, कोयना धरणातील पाण्याची आवक प्रचंड वाढली; पहा आकडेवारी

Satara Rain Update

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी पावसाचा कहर पाहायला मिळाला. महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) चोवीस तासात ३३१ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. नवजामध्ये २७२ आणि कोयनानगरमध्ये २५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात पाणलोट क्षेत्रात एकूण ८५६ मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे धरणातील (Koyna Dam) पाण्याची आवक ७५ हजार क्युसेकवर … Read more

Satara News : उद्या ५ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Satara News

Satar News । जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 … Read more

Satara News : कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी; 7 TMC पाणी वाढले, अनेक रस्ते बंद

Koyana dam rain

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाची कालपासून न थांबता पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने रौद्र रुप धारण केल्यामुळे वनविभागाने ओझर्डे धबधबा … Read more

कोयना नदी काठावरील ‘या’ गावच्या पाणवट्यावर मगरीचे दर्शन

Koyna River Crocodiles News

कराड प्रतिनिधी | कराड व पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. दरम्यान, आज अचानक नदीकाठच्या गावात राहणाऱ्या काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले आहे. निसरे ग्रामपंचायतीचा कर्मचारी शरद कोळी हा पाण्याच्या टाकीत टीसीएल टाकण्यासाठी गेला असताना त्याला नदीपात्राच्या कडेला मगर दिसल्याने त्याने याबाबत गावातील ग्रामस्थांना कलपणा दिली. नदीकाठच्या गावांमध्ये मगरीचे दर्शन होऊ लागल्यामुळे … Read more