‘थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,’ असे म्हणत उपनगराध्यक्षासह दोघांकडून एकावर जीवघेणा हल्ला;

Patan Crime News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । “थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,” असे म्हणत तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाटण येथे आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाटण नगरपंचायतीचा उपनगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण प्रकरणातील तिघेजण फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 1) सागर दादासो पोतदार (वय ४०, रा. जुना स्टैंड, … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला

Balasaheb Patil News 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आ. बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि. 18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगिती दिली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत आदेश दिलेला होता. राज्य सरकारने नुकताच महाविकास … Read more

Karad News : ‘काही दिवस थांबा, सगळं शांत झाल्यावर तुमचं काम होईल’; पोलिसांचा संशयितांना ‘प्रशंसनीय’ सल्ला!

Karad Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात झालेल्या लूटमारीच्या गुन्ह्यात ज्या मालाची लूट झाली. नेमके तेच दडवून भलताच मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आणण्याची चतुराई उंब्रज पोलिसांनी दाखवलीय. तरी देखील ‘प्रशंसनीय’ कामगिरी केल्याचं सर्टिफिकेट वरिष्ठांनी देऊन टाकल्यामुळे सगळेच या प्रशंसनीय कामात वाटेकरी होऊ पाहत असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘हॅलो महाराष्ट्र’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामुळे पोलीस दलात … Read more

Satara News : साताऱ्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकीची तोडफोड

Satara Crime News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी कोयता गँगकडून एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केल्याची घटना काल बुधवारी … Read more

कराडात समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणात एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; उपोषणकर्ते आक्रमक

Karad News 9 jpg

कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणस्थळी आज गुरुवारी एक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. यावेळी उपोषणकर्त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपोषणकर्त्यांच्या उपचाराकडे येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिरंगाई केली जात आहे. … Read more

मलकापूर नगरपरिषदेच्या रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा; ‘ते’ शॉप बंद करण्यासाठी रहिवाशांचे निवेदन

Malakapur News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा डंका वाजवणाऱ्या मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरी वस्तीत सुरू असलेल्या एका मोटर वाइंडिंगच्या शॉपच्या वाहनांमुळे पाईप लिकेज होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ते मोटर वाइंडिंगचे शॉप बंद करण्यासाठी शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. मलकापूरात राहत असलेल्या स्थानिक … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ‘या’ दिवशी येणार साताऱ्यात; 1 वर्षे राहणार संग्रहालयात

Chhatrapati Shivaji Maharaj Tiger Claws News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी बाहेर काढला होता ती वाघनखं प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता सातारकरांना मिळणार आहे. ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे 3 वर्षे आपल्या देशात राहणार असून पहिल्यांदा दि. 17 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात येणार आहेत. सातारा येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षेला शनिवारपासून सुरुवात

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील परीक्षेस अखेर मुहुर्त लागला आहे. शनिवार, दि. 7 आॅक्टोबरपासून याची प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी परीक्षा होत असून ती 11 आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील 972 पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून 5 ते 25 आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने … Read more

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे वैचारिक उत्खननाचे काम ऐतिहासिक : माजी आमदार लक्ष्मण माने

H.A Salunkhe News 20231005 101718 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सामाजिक समतेची वाटचाल रुजत असताना आजमितीस देशात पुन्हा अनावश्यक धर्मांधता आणि हिटलरशाही उदयास आली आहे. ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्राच्य पंडीत डॉ.आ. ह. साळुंखे यांनी वैचारिक उत्खननाचे ऐतिहासिक काम करुन ठेवले असून ते हिमालयाएवढे आहे. त्यामुळे ज्यांना कोणतेच अधिकार नव्हते, त्यांना वास्तव, सत्य विचार कळाले. त्यातून मिळालेले बंधुभावाचे, समानतेचे विचार पुढे घेवून समाजातील … Read more

सातारा-लोणंद रस्ता 7 दिवसांसाठी बंद; SP समीर शेख यांच्याकडून अधिसूचना जारी

Satara Lonanad Road News 20231005 094751 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वाठार स्टेशन -सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीतील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल नवीन रेल्वेलाइनकरिता पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील सात दिवस बंद राहणार असल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशनजवळील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल, दुहेरी रेल्वेलाइन … Read more

तृतीय पंथीयांनो समस्या असल्यास करा ‘या’ नंबरवर Call, मिळेल तत्काळ मदत! साताऱ्यात विशेष हेल्पलाईन कक्ष सुरु

Transgender News jpg

कराड प्रतिनिधी । शरीराने स्त्रियांसारख्या दिसत असल्या तरी त्या सर्वसामान्य स्त्रीसारख्या विवाह करू शकत नाही. तर पुरुषा सारखे मेहनत करू शकत नाही. टाळ्या वाजवून पैसे मागने आणि त्या बदल्यात आशीर्वाद दिला जातो. पूर्वीच्या काळी त्यांना समाजाकडून हिणवले जात असे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यांनाही समाजात मान दिला जातोय. आणि आता तर त्याच्या समस्या व … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more