पुसेसावळी दंगलीनंतर साताऱ्यात शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Satara Shivendraraje Bhosale News 20230913 122856 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या राड्यात दंगलीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रक काढून प्रतिक्रिया दिली आहे. “सातारा जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे. सातारकरांसाठी सध्या कसोटीचा काळ असून, या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा … Read more

पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता ‘या’ ठिकाणी पोलीस अलर्ट मोडवर

Satara Pune News 20230913 115034 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीमुळे पोलिस प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे. दरम्यान, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळपासून पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पुणे … Read more

कराड मराठा क्रांती मोर्चातील सहभागी 200 गावाचा चक्री उपोषणाबाबत मोठा निर्णय

Maratha Kranti Morcha Karad News 20230906 120557 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजालाआरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील 200गावांचे आज बुधवारपासून सुरू होणारे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून आजपासून चक्री उपोषण जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दुर्दैवी घटनेच्यापार्श्वभूमीवर कराड शहरात मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण … Read more

खेड शिवापूर टोलनाक्यावर साताऱ्याकडे येणाऱ्या ट्रकसह 65 लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 20230912 153442 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोफा, टेबल, फ्रिज आदी घरगुती साहित्याची ट्रकमधून वाहतूक करत असल्याचे भासवून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणार्‍या दोघांना राजगड पोलिसांनी पकडले. पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. 11) सकाळी साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 57 लाख 12 हजार 800 रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा एकूण 65 लाख … Read more

फलटणला बिगर परवाना देशी दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

Phalatan Crime News 20230910 114750 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुका आसू येथे गेल्या अनेक दिवसांपासून देशी दारूची विक्री होत असल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात होती. दरम्यान, आसू (ता. फलटण गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूची बिगर परवाना विक्री करताना फलटण ग्रामीण पोलिसांनी एकावर कारवाई केली. त्याच्याकडून ९१० रूपये किमतीची देशी दारूच्या १३ सीलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त … Read more

धाकल्या पवारांच्या दौऱ्यात थोरल्या पवारांच्या गटातील ‘छुपे रूस्तम’ उघड होणार?

Ajit Pawar News 20230909 220807 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वागताचे बॅनर झळकले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड झाली असून काही छुपे रुस्तम उद्या प्रत्यक्ष दौऱ्यावेळी समोर येणार आहेत. अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रात दुसरा … Read more

तासवडे MIDC मध्ये झाली गॅस गळती; 2 परप्रांतीय कामगारांना श्वसनाचा त्रास सुरू

Tasavade MIDC 20230909 170424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | तासवडे एमआयडीसीतील एक खळबळजनक घटना घडली आहे. पाईप लिकेजमुळे गॅस गळती होऊन 2 कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उंब्रजच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कामगार हे परप्रांतिय असल्याचे समजते. रॉयल फूडस् प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेला तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक … Read more

‘फाशीच्या वडा’खाली शिकवला विद्यार्थ्यांना हुतात्म्यांचा धडा; साताऱ्यातील ‘या’ शाळेचा अनोखा उपक्रम

Studant News 20230909 152306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक इतिहासिक ठिकाण असलेल्या ‘फाशीचा वड’ या क्रांतिकारी ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी पाच क्रांतिकारकांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले, तर सहा जणांना गोळ्या घातल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना या प्रेरणास्थळी घेऊन जाऊन ‘ते अमर हुतात्मे झाले’ या कवितेचे … Read more

महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय…; दुरवस्थेवरून आ. शशिकांत शिंदेंचा संताप

Shashikant Shinde 20230909 140147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांत पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार … Read more

जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ganeshotsav News 20230909 130147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात 19 ते 28 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव व 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे. या करिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकारा नुसार दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत कालावधीकरिता अधिकार प्रदान केले … Read more

बिबट्याच्या हल्ल्यानंतर पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला वन विभागाकडून ‘ट्रॅप कॅमेरे’

Traip Camera News 20230909 085440 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या गमेवाडी गावातील शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वन विभागाने डोंगराच्या पायथ्याला ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. पाठरवाडी डोंगराच्या परिसरात कोणकोणत्या वन्य प्राण्यांचा वावर आहे. तसेच … Read more

कराडच्या प्रिशाने आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पटकावला कांस्यपदकाचा बहुमान

Sport News 20230908 225140 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराडच्या आगाशीवनगर येथील युवा खेळाडू प्रिशा शेट्टीने शुुक्रवारी आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला आहे. तिने पदार्पणात पदक विजेती हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.तिची लेबनाॅन येथील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. कॅडेट गटामध्ये पदकाची मानकरी ठरलेली प्रिशा ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सातारा जिल्ह्याची खेळाडू कुमारी प्रिषा … Read more