सातारा जिल्ह्यातील ‘या’ गडावरील मंदिराचा भराव खचला; कोणत्याही क्षणी…

Fort Sajjangadh News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सातारा व पाटण तालुक्यात अति दुर्गम डोंगर भाग आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता पावसाळ्यात सर्वाधिक असते. सातारा तालुक्यातील किल्ले सज्जनगड देखील अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे. येथील पायरी मार्गावर असणाऱ्या गायमुख मंदिराच्या पायाचा भराव अतिवृष्टीने खचला आहे. त्यामुळे गायमुख मंदिराला धोका निर्माण झाला … Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी; पालकमंत्री शंभुराज देसाईंचे निर्देश

Shambhuraj Desai 1

कराड प्रतिनिधी । हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा … Read more

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार; 24 तासात ‘इतका’ TMC वाढला पाणीसाठा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. धरण 25 टक्के भरले असून नवजा व महाबळेश्‍वर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC पाणीसाठा वाढला असून १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 77 (1149) मिलिमीटर, नवजाला … Read more

कोयना धरणात आवक वाढली; ‘इतका’ वाढला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. परिणामी नद्या, ओढ्याची पाणी पातळी वाढू लागली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत नवजा येथे सर्वाधिक 133 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयना धरणात 1 TMC ने साठा वाढला आहे. सकाळपर्यंत धरणात 25.08 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. मुसळधार पावसामुळे कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, … Read more

मोरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनो सावध रहा…; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Morna River Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांत पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी या तालुक्यातील मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोरणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थ, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोरणा गुरेघर … Read more

पावसाच्या संततधारेमुळे वेण्णालेक धरणाचा सांडवा लागला ओसंडून वाहू

Vennalek Dam News

सातारा प्रतिनिधी । गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत पावसाची संततधार सुरु असून पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात 138 मिली मीटर पावसाची नोंद असून काल शुक्रवारपासून वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महाबळेश्वर व … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.5 TMC ने वाढ; प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC ने वाढ झाली आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद 30 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 153, नवजामध्ये 124 आणि कोयनानगरमध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस आणि पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा … Read more

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर पहाटेच्यावेळी कोसळली दरड

Crack Removed by JCB News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दुर्गम अशा डोंगराळ भागातील रस्त्याकडेला असलेल्या डोंगरातून दरड कोसण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोळण्याची घटना घडली. अचानक दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. प्रशासनाकडून या मार्गावरील दरड जेसीबीच्या साह्याने हटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. … Read more