कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 80.08 TMC

Dams in Satara

पाटण प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात पाण्याची चांगली भर पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.08 टीएमसी झाला असून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा सुरु

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान , पावसाळा आला कि कोयना धरण क्षेत्रामध्ये असलेल्या दुर्गम गावातील रस्ते व पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील लोकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे दळणवळण करता येत नाही. त्यांना बोटीच्या माध्यमातून प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. अशीच सुविधा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वाढ; 79.70 TMC झाला पाणीसाठा

jpg 20230728 100949 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. दरम्यान, कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 79.70 टीएमसी झाला असून, सुमारे 75.72 टक्के धरण भरले आहे. जलाशयात प्रतिसेकंद 19 हजार 297 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग … Read more

कोयना धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; 75.77 TMC झाला पाणीसाठा

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 20 हजार 106 क्युसेस अशी सुरू आहे. तर धरणात सध्या 75.77 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जलाशयाचा … Read more

कोयना धरण 70 टक्के भरलं; धरणाचा पाणीसाठा झाला 74.22 TMC

Satara Rain Update

पाटण प्रतिनिधी । राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह उन्ह सावल्यांचा खेळात अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आज मंगळवारी हवामान विभागाने कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ चा इशारा दिला आहे. तसेच पाटण तालुक्यातील कोयना धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 24 हजार … Read more

पावसाने उघडीप देताच अधिकाऱ्यांनी बांबूसह 35 फळ झाडांची केली लागवड

Mandaga bamboo News

पाटण प्रतिनिधी । गेल्या आठवडा भरापासून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, या विभागात पावसाने काही प्रमाणात उघडीप देताच पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी हेळवाक महसूल मंडळातील तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने स्थानिक श्रमजीवी य सेवाभावी संस्थेच्या जमिनीत आंबा, चिकू यासारख्या 35 फळ झाडांची रोपे लावली. संबंधित संस्था मांडगा बांबूची … Read more

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग; 66. 90 TMC पाणीसाठा

jpg 20230728 100949 0000

पाटण प्रतिनिधी | सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे धरणात गेल्या 24 तासात 2.6 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 66. 90 टीएमसी पाणीसाठा आहे. रात्री उशिरा 8.30 वाजता धरणाच्या पायथा विद्युत गृहातील 2 नंबरचे युनिट कार्यान्वित … Read more

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा आज दरवाजा उघडणार; धरणात ‘इतक्या’ TMC साठ्याची नोंद

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. दरम्यान पाटण तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणात 64.32 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी … Read more

कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने रस्ता खचला

Kumbharli Ghat Karad-Chiplun Road News

पाटण प्रतिनिधी । सध्या सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने घाट मार्गावरील रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील मार्गावरील सोनपात्र वळणावरील दरड कोसळून रस्ता खचून गेला असल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या उपाययोजना … Read more

पाटण तालुक्यातील टोळेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

Patan Tolewadi News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातीळ महाबळेश्वर, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्याला आला असताना आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता वाहतुकीस … Read more

सातारकरांची चिंता मिटली ! कास तलाव झाला ओव्हरफ्लो…

Kas Lake News

सातारा प्रतिनिधी | गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात पर्यटन वाढावे, या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे. दरम्यान, सातारा तालुक्यातील ठोसेघर … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्‍ये सर्वाधिक पाऊस; कोयना धरणातून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग

Mahabaleshwar

सातारा प्रतिनिधी | गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस झाल्‍याची नोंद जिल्‍हा प्रशासनाकडे झाली आहे. तर काल कोयना धरणातून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून 56.47 TMC इतका धरणातील पाणी साठा झाला आहे. कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 126 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये … Read more