सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, लाडकी बहीण सोहळ्याचे बॅनर पडले पाण्यात

Satara News 20240818 085921 0000

सातारा प्रतिनिधी | लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा साताऱ्यात आज होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी (शनिवारी) रात्री साताऱ्यात मुसळधार पावसाने सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर चिखल केला. वादळी वारे आणि पावसामुळे लाडकी बहीण वचनपूर्तीचे बॅनर पाण्यात पडले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आठवडाभर … Read more

विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस झाला सक्रिय; ढगांच्या गडगडाटासह मुसळधारपणे लावली हजेरी

Satara News 20240817 185353 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात आज खऱ्या अर्थाने शनिवारी पाऊस पुन्हा सक्रीय झाला. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात धो-धो पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. तर सातारा शहरात आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर … Read more

धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या … Read more

जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची तलावात आवक सुरू; नेर तलाव भरला ‘इतके’ टक्के

Khatav News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेला व राणी व्हिक्टोरिया यांच्या काळात बांधलेला ब्रिटिशकालीन अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणारा आहे. खटावसह गावांची माण तहान भागवणाऱ्या नेर तलावात सध्या ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिहे- कठापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Jitendra Dudi News 20240801 210319 0000

सातारा प्रतिनिधी | भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 1 ते 5 ऑगस्ट 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. जिवीत … Read more

जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर

Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर … Read more

मुसळधार पावसाचा इशारा; मूळगाव, निसरे फरशी, मेंढघर पूल पाण्याखाली

Patan Nisare News

पाटण प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान ७ तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने … Read more

पुन्हा मुसळधार पाऊस; कोयना धरणात वाढला ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Patan Rain News 20240801 092407 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. दरम्यान रात्रभर पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण … Read more

सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी; नदीसह नाले लागले दुथडी भरुन वाहू

Satara Rain News 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याच पाहायला मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे तर नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अक्षता आज सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारो … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरले ‘इतके’ टक्के

Koyna News 20240731 092302 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता. तरी धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे सात फुटांवरून नऊ फूट उचलण्यात आले असून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीपातळीत देखील … Read more

सातारा, वाईसह पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीचा दणका; जिल्ह्यात 207 घरांना फटका तब्बल

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलया पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय शेतकऱ्यांची घरांची, जनावरांच्या शेडची अनेक ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत … Read more