कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री खटाव तालुक्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गावातील अनेक घरांत पाणी शिरले. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत 104.28 TMC पाणीसाठा झाला तर … Read more

जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात 103.63 TMC पाणीसाठा

Satara News 20240926 092444 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली आहे. जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात चांगलाच पाऊस होऊ लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि नवजाला चांगले पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला असून कोयना धरणात 103.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून … Read more

सातारा जिल्ह्यास आज अन् उद्या ‘हा’ अलर्ट; मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 102.76 TMC पाणीसाठा

Koyna News 20240925 115823 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 97.63 टक्के … Read more

विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस झोडपणार; सातारा जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

Satara News 20240924 134626 0000

सातारा प्रतिनिधी । दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तासभर झोडपून काढले. सकाळपासून राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात विविध शहरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. पावसाचा जोर आजही काही ठिकाणी कायम … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 20240923 123239 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काल रविवारी पावसाने चांगली हजेरी लावली. सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण 97.63 टक्के भरलं आहे. कराड तालुक्यातील काही भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी … Read more

जिल्हयातील सात तालुक्यांतील 2083 शेतकऱ्यांना पावसाचा फटका

Satara News 20240922 210536 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे सात तालुक्यांमधील २ हजार ८३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. सुमारे ५२८.३९ हेक्टर बागायत व जिरायत क्षेत्रावरील खरिप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे. फलटण तालुक्यात १ हजार १३३ शेतकऱ्यांचे ४३४.३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप हंगामात कमी … Read more

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Satara News 20240910 110758 0000

सातारा प्रतिनिधी | पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत … Read more

पावसाचा आजपासून जोर वाढणार; सातारा जिल्ह्याला आहे ‘हा’ अलर्ट

Satara News 20240907 102950 0000

सातारा प्रतिनिधी | मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना 3 दिवस अतीमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; ‘इतक्या’ हेक्टरवरील शेतीचे झाले नुकसान

Satara News 20240831 110005 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून महिनाभरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे पाच तालुक्यांतील २५५.१२ हेक्टरवरील १३८० शेतकऱ्यांचे, तर बागायती पिकांचे कराड, पाटण आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांतील ११.३० हेक्टरवर असे एकूण २६६.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

कोयनेसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Patan News 12

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून सोमवार आणि मंगळवारी पाटण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या तालुक्यातील मल्हारपेठ, निसरे भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसीवर गेला आहे. सातारा … Read more

सातारा शहराला पुन्हा झोडपले; अचानक पावसामुळे नागरिकांची धावपळ

Satara News 20240819 203625 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह परिसराला सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहत होते. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही धावपळ करावी लागली. शहरासह तालुक्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस कमी होत गेला. त्यातच मागणी आठवड्यात पावसाची पूर्ण दडी होती. पण, तीन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. शनिवारी आठवड्यानंतर शहरात पाऊस … Read more

जिल्ह्यासह सातारा शहराला पावसाने झोडपले; सर्वत्र पाणीच पाणी

Satara News 20240818 152850 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काल आणि आज सातारा शहर व परिसरास ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले.शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जावली तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून … Read more