अतुल भोसलेंसह उदयनराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; सकाळी 9 वाजेपर्यंत झाले जिल्ह्यात ‘इतके’ टक्के मतदान

Satara News 66

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सर्वात महत्वाची ठरलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पत्नी सौ. गौरवी भोसले व कुटुंबासह रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवार मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला. … Read more

कराडच्या कोळेवाडीत पैशांचे वाटप करताना एकजण रंगेहाथ सापडला Video व्हायरल…; पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

Karad News 20241118 172458 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुल भोसले तर महाविकास आघाडी कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत आहेत. आरोप प्रत्यारोप यांनी कराड दक्षिण मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले असताना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाल्याने … Read more

पृथ्वीराजबाबा विधानसभेचं मटेरियल नाही ते तर…; कराडात देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Karad News 36

कराड प्रतिनिधी । पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते विधानसभेचे मटेरिअल नाहीत ते तर आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. तुम्ही त्यांना इथंच अडवून ठेवताय. विधानसभेचं विधानसभेचं.. विधानसभेचं. आता तरुण, उमदर, जनतेत राहणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा असा आमदार दिला पाहिजे ना. कोणत्याही पदावर नसताना अतुल भोसलेंनी विकासकामे मंजूर करून आणली. मात्र पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना एक … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या मलकापुरात जाहीर सभा

Karad News 35

कराड प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकी प्रचार सभांना हजेरी लावत आहेत. दरम्यान, महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर, ता. कराड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या शुक्रवार दि. … Read more

कराडात डॉ. अतुल भोसलेंच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन उत्साहात

Karad News 20241105 224815 0000

कराड प्रतिनिधी | भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना कराड शहरासह ग्रामीण भागात मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. ही निवडणूक महिला आणि युवावर्गाने हातात घेतली आहे. या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांचा विजय निश्चित असून, या विजयात कराडकरांचा वाटा मोलाचा राहील, अशी खात्री य मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

Karad News 20241024 133204 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुरेश भोसले, … Read more

भाजपची पहिली यादी जाहीर; साताऱ्यातून शिवेंद्रराजे, माणमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

BJP News 1

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर साताराजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमधून जयकुमार … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना निवडणूक जड जाणार! ठाकरे गटाच्या ‘कॅप्टन’ने लावला ‘मिशन विधानसभा’ चा बॅनर

Karad News 58

कराड प्रतिनिधी । दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Karad South Legislative Constituent Assembly) हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी हा बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ढासळणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे. निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत फूट झाल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटातील सातारा जिल्ह्याचे समन्वयक व कराडचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) … Read more

अतुलबाबांनी पूर्ण केलं अनोखं चॅलेंज; झणझणीत चटणीपासून बनलेल्या डिशवर मारला ताव

Karad News 71 jpg

कराड प्रतिनिधी | भाजप नेते आणि सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एक अनोखं चॅलेंज पूर्ण केलं आहे. दुबई येथील एका हॉटेल मध्ये तिखट मिरची आणि झणझणीत चटणीपासून बनलेला एक पदार्थ खात अतुलबाबांनी मराठी बाणा दाखवून दिला आहे. याबद्दल अतुल भोसलेंना विजेतेपदाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असून याबाबतचा त्यांचा फोटो सुद्धा सर्वत्र व्हायरल होत आहे. हे … Read more

विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविणार : डॉ. अतुल भोसले

Anti Airport Expansion Action Committee Dr. Atul Bhosles visit 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वारुंजी, मुंढे, गोटे, केसे, पाडळी या भागातील ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणाला विरोध दर्शविला आहे. मात्र, विकासाचे काम करताना स्थानिक घटकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार नेहमीच घेत असते. त्यामुळे कराड येथील विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे आश्वासन भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले … Read more

नरेंद्र मोदी हे जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान : डॉ. अतुल भोसले

Atul Bhosale News 20230922 181203 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. … Read more

डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर

Atul Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत … Read more