कराड प्रतिनिधी | तडीपार असतानाही कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत येऊन दहशत माजवत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी आवळल्या. देवा अशोक येडगे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांनी ही माहिती दिली.
याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, माहितीनुसार, देवा येडगे व त्याच्या इतर साथिदारांना कराड शहर पोलीसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र तरीही देवा येडगे हा कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जखिणवाडी गावात येवून दहशत माजवत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरिक्षक राजू डांगे यांना मिळाली. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार डांगे यांनी सापळा रचत तडीपार देवा अशोक येडगे याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, शशिकांत काळे, महेश शिंदे, आनंदा जाधव अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संतोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केली.