शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भरदिवसा खून झाला होता. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहचले आहेत. शरद मोहोळ याचा तीन हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली होती. या गुन्हय़ात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे.

अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामधे मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले. धनंजय वाटकर असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कराडात गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च महिन्यात 14 पिस्तुलसह दहाजणांना अटक करण्यात आली होती. या गुन्हय़ात वाटकर याचा सहभाग होता.