सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर साधला निशाणा; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाकडून केल्या जात असलेल्या हप्ते वसुलीचा पाढाच अंधारे व धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या समोर वाचून दाखवला. अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री राहिलेल्या शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. “मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा, केस टाकण्याची भाषा केली. आता त्यांच काय म्हणंण असेल?, असा सवाल अंधारे यांनी केला.

पुण्यात आज काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या. तिघांनीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन पुणे शहरात अवैध सुरु असलेल्या पबसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महानगरपालिकेने नियमावली जाहीर केल्यानंतर तिचं उल्लंघन होत पब चालवले जातात. तरी प्रशासन काहीच कारवाई कसं करत नाही. विद्यार्थ्यांना गांजा कसा मिळतो, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री चालतेच कशी? असे संतप्त सवाल यावेळी सुषमा अंधारे आणि रविंद्र धंगेकरांनी विचारले.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची चौकशी केली जाईल, असे आश्वासन अंधारे आणि धंगेकर यांना दिले आहे.