पोलीस अधीक्षकांना 2 प्रकरणात उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एक पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांच्या सातारा पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस अधीक्षकांना दि. ११ जुलै रोजी आणि कोरोना प्रादुर्भावात रुग्णांना जिवंत दाखवून आ. जयकुमार गोरे व इतरांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी दि. २२ जुलै रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १० जानेवारी २०२३ रोजी काश्मिराच्या तक्रारीनंतर, सातारा पोलिसांनी भांबळ, गोरख मरळ आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध ५० लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल आणि त्यांच्यातील आर्थिक वादानंतर तिच्याकडून ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला. भांबळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनासाठी आणले की, मी तक्रारदार असताना पोलिस कर्मचारी राहुल घाडगे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मला सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटली आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे वर्ग करावा अशी विनंती करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केली.या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

सातारा पोलिसांनी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांना मागील महिन्यात ताब्यात घेतले होते. या प्रकरणात ८२ लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर जामीन मंजूर करण्यात आला ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.

कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांनी सातारा, वाई, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, कराड येथील अनेक धनिकांना वेगवेगळी कामे करतो असे सांगून फसवणूक केली आहे.आपल्या नावाची चर्चा नको बदनामीच्या भीतीने या धनिकांनी पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र याबाबत पोलीस पातळीवर तपास अद्याप सुरू आहे.

त्यानंतर दुसरे प्रकरण म्हणजे कोरोना प्रादुर्भावात रुग्णांना जिवंत दाखवून आ. जयकुमार गोरे व इतरांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोप करत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणारी याचिका मायणी (ता. खटाव) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुनावणी करताना न्या रेवती मोहिते डेरे आणि न्या एस सी चांडक यांच्या खंडपीठाने सातारा पोलीस अधीक्षकांना दि. २२ जुलै रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.