सुपारीबाजांकडून कास परिसरातील यवतेश्वर घाटात गोळीबाराचा सराव; ढाने खून सुपारी प्रकरण

0
870
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर झालेल्‍या मारहाणीचा बदला घेण्‍यासाठी धीरज ढाणेच्‍या खुनाची सुपारी देणाऱ्या नीलेश वसंत लेवेसह सात जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील संशयितांनी चौकशीदरम्‍यान गोळीबाराचा सराव गोळीबाराचा सराव कास परिसरात यवतेश्वर घाटात केल्‍याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांच्या विधानसभा माहितीनुसार, निवडणुकीत माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांची पती वसंत लेवे (रा. सातारा) यांना मारहाण झाली होती. याचा राग मनात धरून धीरज ढाणे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा गेम करायचा होता. यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश लेवे याने संशयितांना २० लाखांची सुपारी दिली होती.

त्यानंतर दरोडा टाकण्‍याच्‍या तयारीत असणाऱ्या टोळीस स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने अटक केली होती. अटकेतील सहा जणांकडून पोलिसांनी दोन दुचाकी, दोन पिस्तूल, धारदार शस्‍त्रे, काडतुसे व इतर साहित्‍य जप्‍त केले होते. चौकशीत अटकेतील संशयितांनी माजी नगराध्‍यक्षा मुक्‍ता लेवे आणि माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश याने धीरज ढाणेच्‍या खुनाची सुपारी दिल्‍याची माहिती दिली.

यानुसार पोलिसांनी नीलेश लेवेसह अनुश चिंतामणी पाटील, दीप भास्‍कर मालुसरे, क्षितिज विजय खंडाईत (तिघेही रा. गुरुवार पेठ), आनंद शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, अक्षय अशोक कुंडुगळे (रा. इचलकरंजी), विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) यांना अटक केली. अटकेतील संशयितांना न्‍यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस कोठडीतील चौकशीदरम्‍यान संशयितांनी कास परिसरात गोळीबाराचा सराव केल्‍याची माहिती दिली. यानुसार त्‍याची खातरजमा करण्‍यात येत असून, त्‍यांनी दिलेल्‍या माहितीची शहानिशा करण्‍यात येत आहे. त्यांनी सांगितलेल्‍या ठिकाणाची पाहणी वरिष्‍ठ पोलिस अधिकारी संशयितांसह करणार आहेत. दरम्‍यान, या सुपारी प्रकरणातील एक संशयित फरार असून, त्‍याचा शोध देखील पोलिस दलाकडून सुरू आहे.