जिल्ह्यातील ‘या’ दोन कारखान्यांचे ऊसबील जमा; 16 कोटी 76 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे दि. १ ते दि. १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी माहिती पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बीलेही आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आज दि. १३ डिसेंबरमध्ये १ ते १५ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बील १६ कोटी ७६ लाख ८१२ रूपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.

साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने आपल्या संचालक मंडळास बीले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्यांची बीलेही लवकरात लवकर जमा करणार असून सभासदांनी आतपर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे.