आता ‘एआय’ द्वारे होणार ऊस शेती; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात 100 हेक्टरवर प्रयोग

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज नव्या एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डिजिटल क्षेत्रात चांगलीच प्रगती झाली आहे. एआयचा आता शेती क्षेत्रात देखील वापर केला जाऊ लागला आहे. शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत असून शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही होत आहे. याच पद्धतीने आता सातारा तालुक्यातील निसराळे येथे ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानावर आधारित १०० हेक्टरवर ऊस शेती केली जाणार आहे. यासाठी राज्य कृषी विभागाने पुढाकार घेतला असून यानिमित्ताने महाराष्ट्रात ‘एआय’चा प्रथमच वापर केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या संकल्पनेतून निसराळे येथे ऊस शेतीत ‘एआय’चा वापर करण्यास सुरुवात केली जाणार आहे. निसराळे गावात सुरुवातीला १०० हेक्टर क्षेत्रावर हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्या दृष्टीने गावातील सुमारे शंभरहून अधिक शेतकऱ्यांची बैठक घेत त्याच्यासोबत चर्चा देखील करण्यात आलेली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी देखील एआयला पसंती देत प्रयोग करण्यास सहमती दर्शवली आहे.

सातारा जिल्ह्यातील पहिलाच हा ‘एआय’चा प्रयोग असणार आहे. यामध्ये गावातील शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला असून यासाठी राज्य कृषी विभागाने फार मोठी भूमिका बजावली आहे. तसेच याबाबतचा प्रस्तावही जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे. त्यातून काही प्रमाणात खर्च केला जाणार आहे.

निसराळेतील शेतकऱ्यांकडून एआयला पसंती : भाग्यश्री फरांदे

एआयच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रयोग करायचा झाल्यास त्यातून मजुरी, पाणी, वेळ आदी गोष्टीची बचत करणे सहज शक्य होणार आहे. असा एक प्रयोग हवामान केंद्र व जमिनीतील खत आणि सेन्सर याच्या मध्यमातून एआय चा प्रयोग आपण निसराळे या गावात घेतोय त्या दृष्टीने गावातील शेतकऱ्यांची एक बैठक देखील घेण्यात आली यामध्ये १०० शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

‘एआय’ मुळे काय होणार?

  • उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
  • कीटकनाशकाची केलेली फवारणी वाया जाणार नाही.
  • खत, औषध पुरवठा करणे सोपे जाणार आहे.
  • उसासाठीच्या पाण्यात बचत.

उत्पादनात वाढ होणार; 40 टक्के पाणी बचत..

  • ‘एआय’चे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.
  • उसासाठी लागणाऱ्या पाण्यात ३० ते ४० टक्के बचत होणार आहे.
  • त्यातच कृषी विभागाने जुलै २०२३ मध्ये निसराळे गावातील शेतकऱ्यांना सुपर केन तंत्रज्ञानाची माहिती दिली होती.
  • ८० शेतकरी सहभागी झाले होते. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
  • उसाचे एकरी उत्पादन ११२ टनापर्यंत गेले आहे.
  • १० ते १२ शेतकऱ्यांनी १०० टनाच्या पुढे एकरी उत्पादन घेतले आहे.