कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून आज रविवारी कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी खा. पाटील यांनी अजानचा नेमका अर्थ काय? मस्जिदचे महत्त्व काय? मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते? याविषयी माहिती घेतली. “कृष्णा कोयना नद्यांच्या काठी संगमावर वसलेल्या या यशवंतनगरीमध्ये हा नवा उपक्रम आज गजानन महाराज प्रकटदिनी पवित्र दिवशी घेण्यात आला. या उपक्रमातुन सामाजिक संदेश दिला जातो. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, या उपक्रम आणि कार्यक्रमातून देशात एकात्मकतेची भावना नक्कीच वाढण्यास मदत होईल, असे खा. पाटील यांनी म्हंटले.
यावेळी पुण्याचे इस्लाम अभ्यासक इम्तियाज शेख, वाजीद कादरी, मंजूर खान यांनी उपस्थितांना अजानचा अर्थ, मस्जिदीचे सामाजिक महत्त्व, कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते? त्याचे आध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व, मस्जिदच्या विविध भागांची माहिती आणि त्यांचे महत्त्व आदिंविषयी माहिती मराठी भाषेत समजावून सांगितली.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, गेली कित्तेक वर्षे जे मनोरे बुधवार पेठेत उभे आहेत. ज्या ठिकाणाहून ईद का चांद पाहण्यासाठी आमची काही मंडळी बघत कित्येक वर्षे बगत होती. ती असे का करत होती? नमाज म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? याविषयी माहिती आज आम्हाला मस्जिद परिचय या कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने जाणून घेता आली. दररोज पाचवेळा नमाज पडणारा कोणीही आजारी पडत नाही. रंजनबाबत वागायचे झाले तर आपले अंतःकरण शुद्ध राहावे, आपली प्रकृती उत्तम राहावी, त्यातून सर्वांना सलाम करणे हि जी धार्मिक कल्पना आहे. ती सामाजिक कल्पना आहे.
यावेळी या कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, इंद्रजित चव्हाण, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, आनंददराव लादे, माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, अमाजी नगरसेच हणमंत पवार, शाही जामा मस्जिदचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्यासह पदाधिकारी, मुस्लिम बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.