माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत; नीरा नदीच्या तिरावर पादुकांचे स्नान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । टाळ मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले.

माऊलीची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल होताच सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, खंडाळ्याचे तहसीलदार अनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर स्नान घालण्याची 700 वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी नीरा नदीवरील दत्तघाटावर आली. यानंतर जेव्हा माऊलीची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा प्रथमच सातारा पोलिस दलातर्फे माऊलींच्या सशस्त्र सलामी देण्यात आली. जिल्हा पोलिस बँड पथकाच्या वतीने विठ्ठल विठ्ठलची धून सादर करून माऊलींना संगीतमय सलामी देण्यात आली.

Mauli's Feet

प्रशासनाने पुरविल्या वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा

आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पाडेगांवमध्ये आज दुपारी आगमन झाले. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा यासह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यावेळी माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर भाविकांनी माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

nira rivar

यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनीही वारकरी बंधू-भगिनींसह या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद वाटला. आजपासून 23 जूनपर्यंत ही पालखी सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी, तसेच वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.