पाटण विधानसभा मतदार संघात रविवारी धडाडणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यभरात प्रचार सभांनी चांगलेच वातावरण तापले आहे. राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी मतदार संघात प्रकाहर सभा घेऊन आपल्या विरोधकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, नुकतेच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पाटण विधानसभा मतदार संघाचे उमेवार हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ सभा घेत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाटण येथील मल्हारपेठमध्ये रविवार, दि. 17 रोजी सकाळी 10.30 वाजता सभा घेणार आहेत. याठिकाणी ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या मातब्बर लोकप्रतिनिधींना धूळ चारण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार हर्षद कदम यांनी देखील आपला पक्षातून अर्ज भरला आहे. आता रविवारी या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात यावेळी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा पालकमंत्री, आमदार शंभूराज देसाई तसेच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर आणि शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम यांच्यात होणारी लढत संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. सध्या येथे प्रचाराची रणधुमाळी सुरू असून मतदारसंघात मोठी वातावरण निर्मिती झाली आहे. मल्हारपेठ येथे हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे. यातून शिवसैनिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता वाढली आहे.