सातारा प्रतिनिधी | शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असलेल्या 26 वर्षीय युवकाला शिरवळ पोलीस ठाणे कडुन पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून उपविभागीय अधिकारी वाई यांनी सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील भोर व पुरंधर या 2 तालुक्यातुन 2 वर्ष कालावधी करीता हद्दपार केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्यावर जरब बसविण्याकरीता कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणे हददीत दहशत माजवित विनयभंग, अॅट्रॉसिटी व मारामारीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे (वय २६ वर्षे, स.मंडाई कॉलनी, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा) याचा सातारा जिल्हा व पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यातुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे दाखल केला होता.
उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन शिरवळ पोलीस ठाणे हददीत विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा जिल्हा, पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यातुन दोन वर्ष कालावधी करीता हद्दपार करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे याला हद्दपार आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे यांचेकडुन हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केद्रे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, वृषाली देसाई, अब्दुल बिद्री, सहा.पो.उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, सुनिल मोहरे, मंगेश मोझर, अजित बोराटे यांनी केली आहे.