सातारा प्रतिनिधी | विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज, वॉशिंग मशिन व कंटेनर असा 21 लाख 87 हजार 153 रुपयांचा मुद्देमाल लंपास करनाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे 58 फ्रिज व 56 वॉशिंग मशिन किंमत 21 लाख 87 हजार 153 रुपयांचे साहित्य भिवंडी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे गोडाऊन येथे पोहोच करण्याकरीता कंटेनर क्र. (NL 01HD0065) हा गोडाऊनला नेण्यात आला नाही. यानंतर संशय आल्याने फिर्यादीने कंटेनरचा ड्रायव्हर अशोक वेणु चव्हाण (वय 41,रा. बेगम तालाब तांडा, पोलीस थाना, जलनगर, ता. जि. विजापुर, राज्य कर्नाटक) याचे मोबाईल नंबरवर फोन केला असता
तो बंद असल्याचे दिसून आले. तसेच गाडीला लावलेली जीपीएस सिस्टीम बंद झालेचा मॅसेज फिर्यादीचे मोबाईलवर आलेला होता.
त्यामुळे फिर्यादीला अशी खात्री झाली की कंटेनरचा ड्रायव्हर अशोक चव्हाण हा कंपनीचा ट्रांन्सपोर्ट साठी कंटेनरमध्ये भरलेली फ्रिज, वॉशिंग मशिन घेवुन पळून गेला आहे. त्यानुसार कंटेनरचालक अशोक चव्हाण याचेविरुद्ध शिरवळ पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करणेत आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण
उपविभागीय अधिकारी राहूल घस यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस निरीक्षक मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार अजित बोराटे, पोलीस अंमलदार तुषार अभंग यांच्या पथकाने विजापुर कर्नाटक, पेठनाका कोल्हापुर तासवडे टोल नाका, विजापुर परीसरातील लमान तांडे आदी परीसरात गोपनीय माहीती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. सदरचे फ्रिज व वॉशिंग मशीन हे विजापुर जिल्हयातील विजापुर तालुक्यातील लमान तांडयामध्ये विविध ठिकाणी परीसरामध्ये विकल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शिरवळ पोलीसांच्या पथकाने विजापुर येथुन गुन्हयामध्ये सहभागी असणान्या आरोपीला वेष बदलत मोठ्या शिताफीने पाठलाग करीत जेरबंद करण्यात यश मिळविले.
यामध्ये शिरवळ पोलीसांच्या पथकाने दिवस रात्र करीत अवघ्या 48 तासामध्ये फ्रिज व वॉशिंग मशिन कंटेनर असा 14 लाख 45 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये शिरवळ पोलीसांनी गुन्हयांमध्ये अशोक वेणु चव्हाण (वय 41 वर्षे, रा. बेगम तालाब तांडा, पोलीस थाना जलनगर, ता.जि. विजापुर, राज्य कर्नाटक) यास अटक केली आहे.
सदरील कामगिरी सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख सो, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर सो, फलटण उपविभागीय अधिकारी राहूल घस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीस उपनिरीक्षक नृराली नेसाई, महा. पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार अजित बोराटे, पोलीस अंमलदार तुषार अभंग यांनी केली आहे.