देशी बनावटी पिस्टल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद; 65 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पंढरपुर फाटा ते लोंणद मार्गावर शिरवळ पोलिसांच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका युवकास ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटी पिस्टल अन् जीवंत काडतुसासह ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी कारवाई करिता पंढरपुर फाटा शिरवळ परीसरात सापळा लावुन संशयीतरित्या फिरणारे युवकास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व एक जिवंत काडतुस असा एकुण मिळुन ६५ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर युवकाविरुध्द शिरवळ पोलीस ठाणेस शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. गुन्हयाचा तपास श्रीमती नयना कामथे, पोलीस उपनिरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे या करत आहेत.

सुरज ऊर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे, (वय २३, रा. आंदोरी ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक करण्यात आल्याचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने आचारसंहिता भंग करणारे व्यक्ती व इसमांवर प्रभावीपणे कारवाई करणेबाबत मा. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांनी जिल्हयातील व विभागातील सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या आहेत. श्री. संदीप जगताप पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती.

शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत पंढरपुर फाटा ते लोंणद जाणारे रोड लगत असलेल्या उत्सव मंगल कार्यालयाच्या बाहेर एक युवक संशयीतरित्या फिरत असुन त्याचे जवळ पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी कारवाई करिता पंढरपुर फाटा शिरवळ परीसरात सापळा लावला. त्यावेळी त्यांनी संशयितरीतीने फिरणाऱ्या युवकास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व एक जिवंत काडतुस असा एकुण मिळुन ६५ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर युवकाविरुध्द शिरवळ पोलीस ठाणेस शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती नयना कामथे करत आहेत.

सदरची कारवाईमध्ये मा. समीर शेख, श्रीमती वैशाली कडुकर, श्री.राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती नयना कामथे, सहाय्यक श्रीमती नयना कामथे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पो. हवा. जितेंद्र शिंदे, सचिन वीर, नितीन नलावडे, पो.कॉ. मंगेश मोझर यांनी सहभाग घेतला आहे.या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांनी अभिनंदन केले.