पाटण प्रतिनिधी | ‘तुम्ही कडवी झुंज दिली, साधा कार्यकर्ता काय इतिहास घडवू शकतो ते पाटण तालुक्याने दाखवून दिले आहे. पराभव झाल्याने शशिकांत शिंदे संपेल असे अनेकांना वाटले होते. मात्र मी पुन्हा जोमाने कामाला लागलो आहे. आता मिळवायचे नाही तर परतफेड करायची आहे. पाटणमधील जे काही प्रश्न आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे. मी पराभवाला घाबरत नाही. तुतारी वाजली नाही, आता न निवडून येता तुतारी कशी वाजते ते सातारा जिल्ह्याला दाखवून देऊ, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
पाटण येथे महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आभार मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, निवासराव पाटील, राजेश पावर, राजाभाऊ शेलार, रमेश पाटील, योगेश पाटणकर, सदाभाऊ जाधव, सुभाषराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, विरोधकांनी विविध आयुध वापरून निवडणूक लढवली. पाटण तालुक्यात थोडे यश मिळाले. यात कमी का पडलो? याचे आत्मचिंतन व करणे आवश्यक आहे. आ. बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह ने, पाटणकर, हिंदूराव पाटील, सुनील रून माने, डॉ. भारत पाटणकर, राजाभाऊ शेलार, निवासराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुभाषराव पवार यांनी न स्वागत केले. शंकर शेडगे यांनी आभार मानले.