कराड प्रतिनिधी | दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या दि. २५ सोमवारी पुण्यतिथी असून या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते पवार हे आज कराड येथे मुक्कामी आले आहेकाही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार, पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. तसेच त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करत त्यांच्या परभवाची कारणे जाणुन घेतली.
कराड येथे आज पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीस माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, सत्यजितसिंह पाटणकर, सुनिल माने, देवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे. आता काय झाले, काय नाही यावर चर्चा करत बसण्यापेक्षा परत जोमाने कामाला लागावे. तळागाळात जाऊन अजून चांगले काम करावे. अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाईल.
बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी
कराड येथे पार पडलेल्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी महत्वाची मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. त्यामध्ये मतांची आघाडी ही मोठ्या फरकाची होती. त्यामुळे हे शॉकींगच आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य ती दखल घेवुन त्याची चौकशी करावी, अशी महत्वाची मागणी केली.