कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सातारा जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणूकीत जे कोणी उमेदवार खासदारकीसाठी उभे राहतील त्यांच्यात चांगलीच लढत होणार हे नक्की. दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्यावतीने जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. आज जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी मलकापूर येथील संजय शंकर पानवळ तर पाटण तालुका कार्याध्यक्षपदी राहुल शंकर कचरे यांची नियुक्ती करण्यात आली.
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संजय पानवळ व राहुल कचरे यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित सोमदे, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद आवटे, मसुरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे, विजयसिंह वाघ सिकंदर शेख, धनंजय कचरे, राहुल कचरे, विजय होवाळ, नितीन पाटील उपस्थित होते.
दरम्यान, कराड तालुका गटसचिव संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक बोराटे व उपाध्यक्षपदी युनूस मुल्ला यांची निवड करण्यात आली. तसेच सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेच्या चेअरमनपदी दादासो माने यांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रकाश पाटील, सुनील शेळके, सुदाम थोरात तानाजी कणसे, दीपक कचरे उपस्थित होते.