पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा भरोसा- सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक व आदर्शवत ठरेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्हा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षितेतकरीता सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये भरोसा केंद्राची उभारणी करुन पोक्सो, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, लैगिंक अत्याचार यामधील पिडीतांना सहाय्य व मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पिडीतांना वेळेवर मदत देणे, पोलीस, वैद्यकीय, कायदेशीर मदत तसेच समुपदेशन हे एकाच छताखाली देण्याच्या दृष्टीने भरोसा केंद्र अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या केद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाला प्रक्षिक्षण द्यायला सुरूवात करा असे सांगून पिडीतांशी संवेदनशिलपणे वागणे, त्यांना अपमानास्पद, निष्ठुरपणे वागणूक यंत्रणेकडून मिळणार नाही याची दक्षता घेणे यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे यासंबंधी प्रशिक्षण घ्यावे.