पालकमंत्री देसाईंनी पाटण तालुक्यातील विकास कामावरून अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला तीन ते चार कामे वाटून द्यावीत, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुनिल गाढे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला तीन ते चार कामे वाटून द्यावीत. कामे वेळेत होण्यासाठी रोहयो व ग्रामपंचायत विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा कामांचा व कोयना भूकंप पुनर्वसन निधी,डोंगरी विकास निधीमधील कामांचाही आढावा घेतला.

या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हा परिषद आवारातील लोकल बोर्डाच्या इमारतीच्या व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पोवई नाका येथील उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामाची पहाणी केली. ही कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.