पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले कोयना धरणावर जलपूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात १०० टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज जलपूजन आणि ओटी भरण करण्यात आले.

कोयना धरण स्थळी झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता निलेश पोदार, सहाय्यक अभियंता सागर पाटील, आशिष जाधव आदी उपस्थित होते.

कोयना धरणातील पाण्याचे विधिवत पूजन करून ओटी भरण केल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले की, कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. सध्या धरण शंभर टीएमसीच्यावर भरले आहे. यामुळे सिंचनासह विद्युत निर्मितीचा प्रश्न मिटला आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात याचा लाभ होणार आहे.