मल्हारपेठ ते कोळोली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व प्रकल्पांचे लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे. त्यामुळे मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

दि. 29 सप्टेंबर रोजी पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. याचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे मल्हार पेठ ते काळोली असा वाहनातून प्रवास करणार आहेत. या रस्त्यांवरील खड्डे दि. 29 सप्टेंबर पूर्वी बुजवावेत, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, काळोली ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण संकुलाचे पहिल्या टप्पयातील इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. याचेही उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी करावी. त्याचबरोबर इमारतीच्या परिसरात विविध झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच इमारतीमधील फर्निचरचे काम वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.