कराड प्रतिनिधी | पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणून जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री देसाई यांनी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, प्रदीप पाटील, रणजीत पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, एसटी आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, बांधकाम विभागाचे अधिकारी चौधरी, यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तालुक्याच्या पुरस्थितीची आढावा दिला. यावेळी त्यांनी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देवुन आवश्यक त्या उपायोजना करण्यात आल्याचे सांगीतले. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी कोयना धऱण व्यवस्थापनाचे अधिकारी पोतदार यांच्याकडुन धरणास्थितीची माहिती घेतली. यावेळी पोतदार यांनी कोयना धरणात सध्या ८३ टीएमसी पाणी असल्याचे सांगीतले.
त्यानंतर मंत्री देसाई यांनी कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणुन जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे अशा सुचना केल्या. त्यानंतर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, अल्लमट्टीमुळे सांगली, कोल्हापुरमध्ये पाणी प्रश्न निर्माण होवु नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांशी बोललेले आहेत. अलमट्टीतुन विसर्ग वाढवण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्याला फटका बसणार नाही यासाठी कर्नाटक सरकारबरोबर आम्ही समन्वय ठेऊन असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.