पाटणमध्ये पुन्हा शंभू’राज’ देसाई; सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदमांचा दारुण पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा साताऱ्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर तर उद्धवसेनेचे हर्षद कदम यांनी मंत्री देसाई यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र, या ठिकाणी त्यांचा फारसा प्रभाव पाडता आला नाही आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी 34 हजार 824 मताधिक्य मिळवला. या ठिकाणी शंभूराज देसाई यांना एकूण 1 लाख 25 हजार 759 इतकी मते पडली. तर सत्यजित पाटणकर यांना 90 हजार 935 मते पडली आणि उद्धवसेनेचे हर्षद कदम यांना 9 हजार 626 मते पडली.

पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेनचे (शिंदे गट) विद्यमान आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांना शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार आणि पारंपारिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी तगडी फाईट दिली. दोघांच्या मतांमधील अंतर फार पडले नाही. त्यामुळे याठिकाणी सुरुवातीला काँटे की टक्कर पहायला मिळाली. मात्र, सरतेशेवटी 34 हजार 824 मताधिक्य घेत शंभुराज देसाई विजयी झाले.

पाटण विधानसभा मतदारसंघात २०१९ साली विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होऊनही त्यावेळी ६७ टक्के मतदान झाले होते. यावेळी तब्बल ७४ टक्के इतके मतदान झाल्याने वाढीव ७ टक्के मतदान नक्की कोणाला तारक व कोणाला मारक ठरणार याकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या. त्यामध्ये खासकरून मंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागले होते. देसाईंसह अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर, महायुतीचे उमेदवार हर्षद कदम यांच्यात तिरंगी सामना असल्याने निकालाबाबत कमालीची उत्सूकता लागून राहिली होती. मात्र, या ठिकाणी शिंदे गटाच्या देसाई यांचा पुन्हा विजय झालियाय. सन २०१९ च्या निवडणुकीत येथे विधानसभेत शंभूराज देसाईंना १,०५,८९२ तर सत्यजित पाटणकरांना ९१,४३५ व अन्य पक्ष, अपक्ष, नोटा यांच्यात ५,९३७ मतांची विभागणी झाली होती. यावेळी देसाई १४,४५७ मताधिक्यांनी निवडून आले होते.