सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर असलेल्या फटाका विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी सातारा शहरामध्ये अवैध फटाका विक्री, दारुगोळा विक्रीवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक साबळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार, गोपनीय अंमलदार, मुद्देमाल कारकुन यांना अवैध फटाक्यांची दारु विक्री व फटाके विक्री करणारे इसमांचेवर कारवाई करणे बाबत सुचना देवुन स्वताही कारवाई करीता शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना मिळाल्या गोपनीय माहितीच्या आधारे 18 शुक्रवार पेठ, सातारा येथील क्रांती स्मृती जनरल स्टोअर्स दुकानामध्ये आम्ही स्टाफसह जावुन दुकानामध्ये असणारे इसमास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रकाश वसंत कोळेकर असे सांगुन सदरचे दुकान मुलगा गणेश प्रकाश कोळेकर चालवित असल्याचे सांगितले. सदर इसमांच्या दुकानात आढळुन आलेल्या फाटक्यां बाबत विक्रीचा परवाना अथवा लायसन्स बाबत विचारणा केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याने सदर दुकान मालक यांनी सांगितले. त्यामुळे दुकानामध्ये ठेवलेले फटाकयांचा करंजे सातारा येथील तलाठी श्री. शेटे यांनी दोन पंचाचे समक्ष पंचनामा केला असुन पोलीसांनीही पंचनामा करुन सदरचे दुकान सील केले आहे. सदर दुकान मालकाकडे एकुण 25 ते 30 हजार रुपये किमतीचे फटाके पंचनाम्याने कारवाई करुन प्रकाश कोळेकर व गणेश कोळेकर यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत्रे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी केली.