शाहुपूरी ‘गुन्हे प्रकटीकरण शाखे’ची धडाकेबाज कारवाई; 3 जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन 2 लाखांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी पोलीस ठाण्यामध्ये तीन ठिकाणी जबरी चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या चोरीचा तपास करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाने तपास करीत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अर्थव अरुण माने (वय 19, रा. पाटखळमाथा ता.जि. सातारा), शारुख नौशाद खान (वय 30, रा.205 सोमवार पेठ सातारा), अकिब जावेद कासिम साहब नांदगळकर (वय 30, रा.निसर्ग कॉलणी बुधवार पेठ सातारा) केलेल्यांची नावे आहेत. याबाबात पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना सदरचे गुन्हे उघकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा तात्काळ शोध घेवुन अटक करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

दि.29/09/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे वाढे फाटा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावुन माहिती घेतली. गुन्ह्यातील संशयीत इसमाचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयीत इसम हे वाढे फाटा सातारा येथील परिसरात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जाऊन संशयीत इसमांचा शोध घेतला असता ते मिळुन आले. सदर दोन इसम त्यातील एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणण्यात आले. त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.372/2024 हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

दि .29/09/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पारंगे चौक येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावुन माहिती घेऊन गुन्ह्यातील संशयीत इसमाचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयीत इसम हे बुधवार नाका सातारा येथील परिसरात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमांचा शोध घेतला असता ते मिळुन आले. सदर दोन इसमाना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.336/2024 हा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी जावुन पाहणी करुन चोरीस गेलेला मोबाईल फोनचा आय.एम.ई.आय नंबर वरुन व तांत्रिक माहितीच्या आधारे दोन विधी संघर्ष बालक निष्पन्न करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरी झालेला मोबाईल फोन व गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकुण 53 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन शाहुपुरी पोलीस ठाणे गुरनं. 342/2024 गुन्हा उघडकीस आणला आहे.

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या आरोपीना गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीस गेलेले 75,500/- रुपेय किंमतीचे 03 मोबाईल व 1,20,000/- रुपये किमतीची गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकल असा एकुण 1,95,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जबरी चोरीचे 03 गुन्हे उघकीस आणले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे, श्री. आय्याज बागवान व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, यांनी केली आहे.